Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > Cattle Breeding Scheme : वासरांनी फुलणार शेतकऱ्यांचे गोठे; पशुसंवर्धन विभागाचा नवा उपक्रम वाचा सविस्तर

Cattle Breeding Scheme : वासरांनी फुलणार शेतकऱ्यांचे गोठे; पशुसंवर्धन विभागाचा नवा उपक्रम वाचा सविस्तर

latest news Cattle Breeding Scheme: Farmers' cowsheds will be filled with calves; New initiative of Animal Husbandry Department read in details | Cattle Breeding Scheme : वासरांनी फुलणार शेतकऱ्यांचे गोठे; पशुसंवर्धन विभागाचा नवा उपक्रम वाचा सविस्तर

Cattle Breeding Scheme : वासरांनी फुलणार शेतकऱ्यांचे गोठे; पशुसंवर्धन विभागाचा नवा उपक्रम वाचा सविस्तर

Cattle Breeding Scheme : अमरावती जिल्ह्यात गाय-वासरांची संख्या कमी होत असल्याने शेतकऱ्यांच्या गोठ्यांना मोठा फटका बसला आहे. यावर उपाय म्हणून पशुसंवर्धन विभागाने 'लिंग विनिश्चित वीर्यमात्रे' तंत्रज्ञानाचा वापर करून भ्रूण प्रत्यारोपण योजना राबविण्याची तयारी सुरू केली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या गोठ्यांना मादी वासरे जास्त प्रमाणात मिळतील, खर्च कमी होईल आणि दुग्ध उत्पादन वाढेल. (Cattle Breeding Scheme)

Cattle Breeding Scheme : अमरावती जिल्ह्यात गाय-वासरांची संख्या कमी होत असल्याने शेतकऱ्यांच्या गोठ्यांना मोठा फटका बसला आहे. यावर उपाय म्हणून पशुसंवर्धन विभागाने 'लिंग विनिश्चित वीर्यमात्रे' तंत्रज्ञानाचा वापर करून भ्रूण प्रत्यारोपण योजना राबविण्याची तयारी सुरू केली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या गोठ्यांना मादी वासरे जास्त प्रमाणात मिळतील, खर्च कमी होईल आणि दुग्ध उत्पादन वाढेल. (Cattle Breeding Scheme)

शेअर :

Join us
Join usNext

Cattle Breeding Scheme : अमरावती जिल्ह्यात काही वर्षांपासून गाय-वासरांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या गोठ्यांमध्ये जनावरांचे व्यवस्थापन आणि आर्थिक खर्च वाढला आहे.(Cattle Breeding Scheme)

यावर उपाय म्हणून पशुसंवर्धन विभागाकडून 'लिंग विनिश्चित वीर्यमात्रे' तंत्रज्ञानाचा वापर करून भ्रूण प्रत्यारोपण योजना राबविण्यात येणार आहे.(Cattle Breeding Scheme)

या योजनेतून मादी वासरे जन्माला येतील आणि शेतकऱ्यांना जनावरांच्या संगोपनासाठी लागणारा खर्च कमी करण्यास मदत होईल. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील गोठ्यांना नवचैतन्य मिळेल आणि शेतकरी आर्थिक लाभ मिळवतील.(Cattle Breeding Scheme)

योजना कशी कार्यान्वित होईल?

वासरे जन्मासाठी कृत्रिम रेतन (Embryo Transfer Technology) वापरण्यात येईल.

नर अथवा मादी वासरे जन्मास येण्यासाठी प्रत्यारोपण प्रक्रियेद्वारे भ्रूण वापरण्यात येईल.

साधारणतः साध्या प्रक्रियेत ५० टक्के नर व ५० टक्के मादी वासरे जन्माला येतात.

या योजनेतून शेतकऱ्यांना मादी वासरे जास्त प्रमाणात मिळतील, ज्यामुळे गोठ्यांचा सांभाळ सुलभ होईल.

पशुसंवर्धन विभागाचे धोरण

पशुसंवर्धन विभागाने यासाठी विशेष योजना तयार केली आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांना अल्प दरात रेतन सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. जिल्ह्यातील पशु दवाखान्यांमध्ये ही सुविधा सुरू होईल.

योजनेचा उद्देश काय?

शेतकऱ्यांच्या गोठ्यांना वासरांची संख्या वाढवणे.

जनावरांचे संगोपन कमी खर्चिक करणे.

दुग्ध उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी उच्च तंत्रज्ञानाचा वापर.

शेतकऱ्यांना होणारा फायदा

जनावरांचे व्यवस्थापन सोपे होईल.

मादी वासरे जास्त प्रमाणात मिळून दूध उत्पादन वाढेल.

कृत्रिम रेतनामुळे खर्च कमी होईल.

'एम्ब्रिओ ट्रान्स्फर टेक्नॉलॉजी' वापरल्याने उच्च उत्पादन क्षमता असणारे जनावर जन्माला येतील.

पशुसंवर्धन विभागाचा प्रस्ताव

डॉ. पुरुषोत्तम सोळंके, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी सांगितले, 'हा उपक्रम पशुपालकांसाठी मोठा आर्थिक लाभ देईल. जनावरांना लिंग विनिश्चित वीर्यमात्रा वापरून रेतन देण्यामुळे शेतकऱ्यांच्या गोठ्यात वासरांची संख्या वाढेल आणि दूध उत्पादनातही भर पडेल.'

अमरावती जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाचा नवीन उपक्रम शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. 'लिंग विनिश्चित वीर्यमात्रे' तंत्रज्ञानाद्वारे मादी वासरे जन्माला येऊन शेतकऱ्यांच्या गोठ्यांचा खर्च कमी करेल आणि दुग्ध उत्पादन वाढेल.

हे ही वाचा सविस्तर : Solar Drying Project : मंदीतील संधीचे सोने करत; शेतमालाला दिले नवे आयुष्य वाचा वंदना ताईंचा यशस्वी प्रवास वाचा सविस्तर

Web Title : पशु प्रजनन योजना: नए बछड़ों से किसानों के खलिहान खिलेंगे।

Web Summary : अमरावती का पशुपालन भ्रूण स्थानांतरण के माध्यम से मादा बछड़ों के जन्म को बढ़ावा देता है, लागत कम करता है और दूध उत्पादन बढ़ाता है। इस पहल का उद्देश्य उन्नत प्रजनन तकनीकों के माध्यम से पशुधन खेती को पुनर्जीवित करना और किसानों की आय बढ़ाना है।

Web Title : Cattle Breeding Scheme: Farmers' barns to flourish with new calves.

Web Summary : Amravati's animal husbandry promotes female calf births via embryo transfer, reducing costs and boosting milk production. This initiative aims to revitalize cattle farming and increase farmers' income through advanced breeding techniques.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.