Auction Livestock : अलीकडे पशुधन बाजार चांगलाच तेजीत येऊ लागला आहे. अनेक शेतकरी शेतीसोबत पशुधनावर खर्च करीत आहेत. दूध व्यवसाय वाढू लागला आहे. अशा स्थितीत वसंतराव नाईक मराठवाडा कषि विद्यापीठ, परभणी येथील पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग कृषि महाविद्यालयाच्या माध्यमातून मुऱ्हा, जाफराबादी व सुरती पशुधनाचा जाहीर लिलाव ठेवण्यात आला आहे.
लिलावात भाग घेण्यासाठीच्या अटी व शती खालीलप्रमाणे :
- १. लिलावात भाग घेऊन बोली बोलणाऱ्या व्यक्तीस प्रथम तीन हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागेल, त्याची पावती लिलाव समितीकडून रितसर मिळेल, अनामत रक्कम भरल्याशिवाय लिलावात भाग घेता येणार नाही.
- २. लिलावाच्या उत्तम बोलीवर म्हणजे जास्तीत जास्त बोली बोलणाऱ्याच्या नावावर लिलाव सोडला जाईल.
- ३. ज्याच्या नावावर बोली सुटेल त्या व्यक्तीस लिलावाच्या बोलीप्रमाणे संपूर्ण रक्कम भरावी लागेल.
- ४. कुठल्याही सबबीवर पुर्ण रक्कम भरल्याशिवाय पशुधन ताब्यात दिले जाणार नाही.
- ५. ज्याच्या नावावर बोली सुटेल तो व्यक्ती पूर्ण रक्कम भरण्यास असमर्थ ठरल्यास त्याची अनामत रक्कम जप्त केली जाईल. अशा व्यक्तीच्या खालोखाल ज्या व्यक्तीची बोली असेल त्यास ती पूर्ण रक्कम रोख भरून त्याच्या बोलीवर पशुधन देण्यात येईल, या बाबतचा सर्व अधिकार लिलाव समितीकडे राहील.
- ६. पशुधनाच्या बोलीची योग्य किंमत न आल्यास तीचा फेर लिलाव करणे किंवा लिलाव रद्द करणे व इतर अधिकार संबंधीत लिलाव समितीस राहतील व याशिवाय लिलाव समितीचा निर्णय अखेरचा आणि सर्वांकरीता बंधनकारक राहील.
- ७. लिलावात विक्री करण्यात आलेले पशुधन कोणत्याही सबबीवर परत अथवा बदलुन दिले जाणार नाही याची संबंधीतांनी नोंद घ्यावी.
दिनांक व वेळ - दि. ०४ मार्च २०२६ बुधवार सकाळी १० वा.
स्थळ - पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, कृषि महाविद्यालय, वनामकृवि, परभणी
