Animal Relief Program : ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील पशुपालकांचे मोठे नुकसान झाले आहे. हजारो जनावरे पुराच्या पाण्यामुळे मरण पावली, तर अनेक वाहून गेली. लाखमोलाचे पशुधन गमावलेले शेतकरी आणि पशुपालक आता हतबल झाले आहेत. (Animal Relief Program)
या परिस्थितीत जिल्हा प्रशासनाने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून आपत्तीग्रस्त पशुपालकांना दिलासा देण्याचे पाऊल उचलले आहे. (Animal Relief Program)
काय आहे उपक्रम
जिल्ह्यातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना गोशाळेतून गो-हे आणि बैल रब्बी हंगामातील शेतीकामासाठी उसनवारीवर उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
जनावरे मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी शपथपत्र भरावे लागेल, ज्यात ते हे जनावरे विक्रीसाठी न काढणार असल्याचे कबूल करतील.
हा उपक्रम जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. राजकुमार पडिले यांच्या नेतृत्वात राबवला जात आहे.
का गरजेचे?
ऑगस्ट-सप्टेंबरच्या पूरामुळे शेतकऱ्यांचे दूध उत्पादक जनावर, ओढकामासाठी वापरली जाणारी बैल, शेळ्या-मेंढ्या व कुक्कुट पक्ष्यांपर्यंत मोठे नुकसान झाले.
राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीअंतर्गत मृत पशुधनाचे भरपाई देण्यात आली आहे, परंतु पुनरुत्थानासाठी शेतकऱ्यांना तातडीचा आधार आवश्यक आहे.
रब्बी हंगाम सुरू होत असल्याने , पूरात पशुधन गमावलेले शेतकरीशेतीकाम सुरू करण्यात अडचणीत होते.
गोशाळा संचालकांचा सकारात्मक प्रतिसाद
१२ ऑक्टोबर रोजी जिल्हा प्रशासनाने सर्व गोशाळा संचालकांची बैठक घेतली. यामध्ये गोशाळा संचालकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
देवकृपा गोशाळा, हिमायतनगर, कृष्णप्रिय गोशाळा, किनवट, श्री गोरक्षण संस्था, मुखेड, अमृतधाम, जगदंबा कोहळी, सिद्धेश्वर श्रीवत्स, माहूर, श्री संत नामदेव महाराज, श्री स्वामी विवेकानंद कुंडलवाडी या संचालकांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला असून, आता शेतकरी आपत्तीग्रस्त जनावर उसनवारीवर घेऊ शकतात.
हे ही वाचा सविस्तर : Tur Mar Rog : जमिनीतील वाढत्या आर्द्रतेने तुरीवर 'मर'; 'या' करा उपाययोजना