Join us
Daily Top 2Weekly Top 5

दुभत्या जनावरांना उसाचे वाढे खायला देणं योग्य की अयोग्य; जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 14:52 IST

उसाचे वाढे तसे दिसायला हिरवेगार दिसतात. त्यामध्ये आवश्यक अन्नघटक मात्र खूप कमी असतात. इतर हिरव्या वैरणीप्रमाणे उसाचे वाढे जनावरांना पोषक नाहीत.

उसाचे वाढे तसे दिसायला हिरवेगार दिसतात. त्यामध्ये आवश्यक अन्नघटक मात्र खूप कमी असतात. इतर हिरव्या वैरणीप्रमाणे उसाचे वाढे जनावरांना पोषक नाहीत. आहार शास्त्रानुसार तो एक निव्वळ वाळलेला चारा आहे.

इतर वैरणीतील पोषण मूल्यापेक्षा खूप कमी असल्याने आपण 'वाळलेला चारा' असे समजायला हरकत नाही. तथापि आज या काळात अगदी घरपोच म्हटले तरी चालेल हे ऊस वाढे तीन-चार महिने उपलब्ध होतात.

पशुपालकांचे चारा पिकाबाबत नियोजन नसल्यामुळे अनेक पशुपालक या ऊस वाढ्याचा उपयोग आपल्या सर्व जनावरांसाठी चारा म्हणून करतात.

खरोखरच आपल्याला ऊस वाढे खायला घालायचे असतील तर मात्र सोबत इतर सकस आहार. वैरण व सोबत ४० ते ५० ग्रॅम उच्च दर्जाचे खनिज मिश्रण प्रति मोठ्या जनावरांस नियमित द्यावे.

साधारण दहा ते पंधरा किलो ऊस वाड्यावर एक ते दीड लिटर चुन्याची निवळी शिंपडावी. रात्रभर तसेच ठेवून सकाळी खाऊ घालावे. चुन्याचे निवळीचे प्रमाण तज्ञांचा सल्ला घेऊनच प्रक्रिया करावी.

उसाचे वाढे अन् पोषणमूल्यांचा अभाव◼️ ऊस वाढ्यात मुळातच पोषणमूल्य कमी असल्याने दूध उत्पादन घटते.◼️ गाभण जनावरांना खाऊ घातल्याने पोटातील वासरास आवश्यक ते पोषक घटक मिळत नाहीत.◼️ त्यामुळे वासराची वाढ नीट होत नाही.◼️ गायीच्या शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरस याचे प्रमाण बिघडते आणि शेवटी गर्भपात होऊ शकतो.◼️ ऊस वाढ्यामध्ये मोठ्या प्रमाणात ऑक्झलेट व नायट्रेट असते.◼️ त्यामुळे शरीरातील कॅल्शियम बरोबर त्याचे रासायनिक संयोग होतो व कॅल्शियम ऑक्सालेट तयार होते.◼️ ते लघवी व शेणावाटे बाहेर फेकले जाते.◼️ दूध उत्पादन व शारीरिक वाढीसाठी कॅल्शियमचे खूप महत्त्व आहे.◼️ तेच शरीराबाहेर फेकले गेले तर कॅल्शियमची कमतरता निर्माण होते. त्यामुळे दूध उत्पादन घटते.◼️ जनावर वेळेवर गाभण राहत नाहीत. वारंवार उलटतात. अनेकवेळा गाभडतात. त्यामुळे पशुपालकाचे खूप मोठे नुकसान होते.

- डॉ. व्यंकटराव घोरपडेसेवानिवृत्त सहायक आयुक्त पशुसंवर्धन, सांगली

अधिक वाचा: थंडीची लाट अन् जनावरांची काळजी; जाणून घ्या हिवाळ्यातील पशुधन व्यवस्थापन

English
हिंदी सारांश
Web Title : Sugarcane tops for cattle: Good or bad? Know the details.

Web Summary : Sugarcane tops lack nutrients, reducing milk production and harming pregnant animals. Supplement with nutritious feed and minerals. Calcium deficiency can cause infertility. Consult experts.
टॅग्स :दुग्धव्यवसायगायदूधऊसशेतकरीशेती