गोपाल लाजूरकर
दिसायला आकाराने छोटी, पण फायदे व उपयोगात मोठी अशी 'पुंगनूर' देशी गाय आता शेतकरी बांधवांसमोर नवे पर्याय म्हणून सादर होत आहे. या दुग्धजन्य प्रजातीबाबत कृषी विभागाने शेतकऱ्यांमध्ये जागृती सुरू केली असून, दुग्ध व्यवसायात त्यांचे योगदान लक्षात घेता अल्पभूधारक शेतकऱ्यांचे दूध उत्पादन वाढविण्यात मदत होणार आहे.
गडचिरोली येथे मागील आठवड्यात पार पडलेल्या पाचदिवसीय 'कोया कृषी कुंभ' महोत्सवात आधुनिक शेतीच्या अवजारांसोबत विविध पिकांच्या वाणांचे प्रदर्शन पाहायला मिळाले, मात्र तिथे उपस्थितांचे लक्ष वेधून घेतलेली एक लहानशी, पण आकर्षक गाय होती. ही गाय म्हणजे आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्याची मूळ रहिवासी 'पुंगनूर'.
दैनंदिन दुधाची मागणी व कमी खर्चात अधिक दुधाचे उत्पादन लक्षात घेऊन पुंगनूर ही गाय फायदेशीर ठरणार आहे. शेतकऱ्यांमध्ये पुंगनूर गायींचा प्रचार वाढविण्याचे काम सुरू असून, लवकरच या देशी गायी स्थानिक दुग्ध व्यवसायात चालना देऊ शकतात.
कमी चारा, कमी जागेत संगोपन शक्य
• पुंगनूर गाय उच्च दर्जाच्या ए-२ बीटा-कॅसिनयुक्त दूध देते, जे अत्यंत पौष्टिक आणि औषधी मानले जाते.
• दिवसाला साधारण ३ ते ५ लिटर दूध देणारी ही गाय, अतिशय कोरड्या हवामानातही सहज तग धरू शकते.
• शांत स्वभावामुळे तिचे सांभाळणे सोपे आहे. कमी जागेत आणि कमी चाऱ्यातही तिचे संगोपन करता येते.
नेमकी काय आहेत 'पुंगनूर' गायीची वैशिष्ट्ये
• पुंगनूर ही जगातील सर्वांत लहान गायींच्या प्रजातींपैकी एक मानली जाते. तिचे आयुर्मान २० वर्षांचे असून तीन वर्षातच तिच्यापासून प्रजनन सुरू होते.
• पूर्ण वाढ झाल्यावरही तिची उंची फक्त २ ते ३ फूट इतकी असते, तर वजनही अवघे १५० ते २०० किलो इतकेच असते. आपल्या बुटक्या शरीरयष्टीमुळे ती कोणाच्याही लक्षात सहज येते.
• आकाराने लहान असली तरी तिचे सौंदर्य आणि मोहकता शेतकरी आणि दुग्ध व्यवसायी दोघांनाही आकर्षित करते.
Web Summary : The Punganur cow, native to Andhra Pradesh, offers a profitable dairy option for small farmers. Requiring less space and feed, this dwarf breed produces high-quality, A2 milk even in dry climates, boosting milk production and farmer income.
Web Summary : आंध्र प्रदेश की पुंगनूर गाय छोटे किसानों के लिए डेयरी का एक लाभदायक विकल्प है। कम जगह और चारे की आवश्यकता वाली, यह बौनी नस्ल शुष्क जलवायु में भी उच्च गुणवत्ता वाला, ए2 दूध का उत्पादन करती है, जिससे दूध उत्पादन और किसान की आय बढ़ती है।