Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > दुधाळ जनावरांची खरेदी करताय? कशी कराल निवड

दुधाळ जनावरांची खरेदी करताय? कशी कराल निवड

How to choose when buying a new cow | दुधाळ जनावरांची खरेदी करताय? कशी कराल निवड

दुधाळ जनावरांची खरेदी करताय? कशी कराल निवड

गाईची किंमतही तिच्या वयावर अवलंबून असते. पहिल्या किंवा दुसया वेताच्या गाईला चौथ्या किंवा त्या पुढील वेताच्या गाईपेक्षा जास्त किंमत द्यावी लागते.

गाईची किंमतही तिच्या वयावर अवलंबून असते. पहिल्या किंवा दुसया वेताच्या गाईला चौथ्या किंवा त्या पुढील वेताच्या गाईपेक्षा जास्त किंमत द्यावी लागते.

बाजारात व्यापारी अथवा पशुपालक शेतकरी यांच्याकडून पशुधन खरेदी करत असताना बऱ्याच वेळी आपली फसवणूक होण्याची शक्यता असते अशावेळी आपण खात्रीशीर पशुपालक व व्यापारी यांच्याकडून खरेदी करणे आवश्यक आहे. आपण पशुधन खरेदी करता असताना कोणकोणते मुद्दे विचारात घेणे आवश्यक आहेत त्यावर आपण नजर टाकूया.

दुधाळ पशुधानांची निवड करताना काय काळजी घ्यावी

  • दुधाळ गाय आकाराने मोठी असली तरी शरीराचा बांधा व्यवस्थित असावा. 
  • वयस्कर गाईचे आकारमान मोठे असते व बांधा सैल असतो.
  • गाईच्या अंगावर जास्त चरबी नसावी.
  • त्वचा मऊ व तजेलदार असावी.
  • मान लांब व सडपातळ असावी.
  • पाठीचा कणा सरळ असावा.
  • बरगड्या चपटया व रूंद असाव्यात. 
  • कमरेची हाडे रूंद व दणकट असावीत. 
  • मांडया पातळ, अर्ध गोलाकार असाव्यात.
  • गाय शांत स्वभावाची असावी.
  • डोके पुरेसे लांब व रूंद असावे.
  • जबडा रूंद व मजबूत असावा.
  • डोळे पाणीदार असावे.
  • छाती भरदार व रूंद असावी.
  • नाकपुड्या रूंद व श्वसन उत्तम असावे.
  • चारही सड सारख्या लांबीचे असावेत. 
  • कास शरीराला घट्ट व मऊ असावी. 
  • जनावरे दुसऱ्या वेताची निवडावी.


संकरित गाय, म्हैस खरेदी करताना घ्यावयाची काळजी

  • संकरित गाय खरेदी करताना फसगत होण्याची शक्यता जास्त असते.
  • संकरित गाय खरेदी करताना शक्यतो ओळखीच्या व्यक्तिकडूनच खरेदी करावी.
  • गाईची किंमतही तिच्या वयावर अवलंबून असते. पहिल्या किंवा दुसया वेताच्या गाईला चौथ्या किंवा त्या पुढील वेताच्या गाईपेक्षा जास्त किंमत द्यावी लागते.
  • पहिल्या किंवा दुसऱ्या वेताच्या गाईची किंमत रु. १५०० प्रति लिटर दूध अशी आहे व वयस्कर गायी १००० ते १२५० रु. प्रति लिटर दूध या किमतीत मिळण्यास हरकत नाही. (परिस्थितीनुसार वेगवेगळी असू शकते)
  • गाय खरेदी करण्यापूर्वी त्या गाईला काही व्यंग आहेत का त्याची पाहणी करावी. 
  • विकत घेणाऱ्या व्यक्तिकडून गाईची चारही सडे चांगली असण्याची व अंग बाहेर न पडण्याची खात्री घ्यावी.
  • गाभण गाय असल्यास किती दिवसाने विणार आहे याची खात्री करून घ्यावी जर ती गाय दिलेल्या मुदतीत विली नाही व मुदतीपेक्षा जास्त महिने लागले तर पुढील होणारे नुकसान टळते.
  • दुधातील गाय विकत घ्यावयाची असेल तर तिचे तीन वेळेचे दूध स्वत: काढून पाहावे व आपली खात्री करून घ्यावी जर एक वेळचे दूध पाहून गाय खरेदी केली तर आपली फसगत झाली असे समजावे. बरेच दलाल गाय तुंबवतात त्यामुळे एका वेळेला गाय जास्त दूध देत असते.
  • १५ ते २० दिवसांत विणारी गाभण गाय शक्यतो खरेदी करावी म्हणजे दूध उत्पादन व्यवसाय किफायतशीर करता येतो. ताजी दुभती गाय विकत घेतल्यास ती आपल्या गोठ्यात गेल्यावर २ ते ३ लिटर दूध कमी देईल.
  • गाय लंगडत नाही ना याची खात्री करावी.
  • शक्य असल्यास तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली गाय खरेदी करा.
  • गाय खरेदी केल्याबरोबर गाईचा विमा उतरविण्यास विसरू नका.
  • दुभत्या जनावरांचे वय दातावरून व शिंगावर असणाऱ्या रिंगावरून ओळखता येते. 

Web Title: How to choose when buying a new cow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.