Join us
Daily Top 2Weekly Top 5

अधिक दूध उत्पादनासाठी व निरोगी जनावरांसाठी कसा बांधाल गोठा? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 17:50 IST

मुक्तसंचार गोठा पद्धत ही आधुनिक आणि शास्त्रशुद्ध पद्धती असून, जनावरांसाठी अधिक नैसर्गिक व सोयीस्कर निवाऱ्याची व्यवस्था या पद्धतीत केली जाते.

mukt sanchar gotha मुक्तसंचार गोठा पद्धत ही आधुनिक आणि शास्त्रशुद्ध पद्धती असून, जनावरांसाठी अधिक नैसर्गिक व सोयीस्कर निवाऱ्याची व्यवस्था या पद्धतीत केली जाते.

या पद्धतीत जनावरांना गोठ्यात एका ठिकाणी बांधून ठेवले जात नाही, त्याऐवजी त्यांना मोकळ्या जागेत वावरण्याची संधी मिळते. त्यामुळे त्यांचा नैसर्गिक वावर कायम राहतो आणि आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.

या पध्दतीच्या गोठ्यात गायी/म्हशींना एकाच ठिकाणी बांधून न ठेवता दिवसरात्र मोकळेच सोडलेले असते आणि फक्त दुध काढते वेळी स्वतंत्र दोहनगृहात किंवा मिल्क पार्लरमध्ये नेऊन दुध काढले जाते.

मुक्तसंचार गोठ्याची रचना व वैशिष्ट्ये१) मोकळा आवारगोठ्यात जनावरांसाठी मोकळी जागा असते, जिथे ते स्वच्छंदपणे फिरू शकतात. या आवाराला कुंपण घालून सुरक्षित केले जाते.२) सावलीसाठी शेडउन्हाळ्यात जनावरांना सावली मिळावी यासाठी साध्या किंवा पक्क्या छपराचा शेड उभारला जातो. या शेडखाली जनावरे आराम करू शकतात.३) चारा व पाणी व्यवस्थाजनावरांना स्वच्छ पाणी आणि सकस आहार मिळेल याची सोय गोठ्यातच केली जाते. गोठ्यातील जनावरांना खाद्य सहजपणे उपलब्ध होईल यासाठी खाद्याच्या गव्हाणींची काळजी घेतली जाते.४) स्वच्छता व व्यवस्थापनगोठ्याच्या मोकळ्या आवारात नियमित स्वच्छता केली जाते. शेण, मूत्र आणि उरलेला चारा यांचा योग्य प्रकारे निपटारा करून गोठा स्वच्छ ठेवला जातो.५) नैसर्गिक हालचालींना प्रोत्साहनजनावरांना मोकळ्या जागेत फिरण्याची संधी मिळाल्याने त्यांचे नैसर्गिक हालचाली वाढतात, ज्यामुळे त्यांची हाडे व स्नायू मजबूत राहतात.

मुक्तसंचार पद्धतीचे फायदे◼️ जनावरांचे आरोग्य सुधारते व रोगप्रतिकारक शक्ती वाढते.◼️ जनावरांच्या नैसर्गिक हालचालींमुळे दूध उत्पादनात वाढ होते.◼️ व्यवस्थापन सोपे व कमी खर्चिक ठरते.◼️ जनावरांना आरामदायक आणि नैसर्गिक वातावरण उपलब्ध होते.◼️ जनावरांच्या वर्तनाचा अभ्यास करण्यास सुलभता मिळते.

मुक्तसंचार पद्धतीचे तोटे◼️ अधिक जागेची आवश्यकता असल्याने काही ठिकाणी ही पद्धत अंमलात आणणे कठीण ठरते.◼️ सतत स्वच्छता आणि निगा राखावी लागते.◼️ पावसाळ्यात किंवा थंड हवामानात विशेष काळजी घ्यावी लागते.

अधिक वाचा: उन्हाळ्यात जनावरांना पिण्यासाठी किती पाणी लागते? व ते कसे द्यावे? जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :दुग्धव्यवसायगायशेतकरीदूधशेती