आपण दुधाचे दररोज सेवन करतो. किंबहुना शेतकऱ्यांकडे गाई-म्हशी, शेळी आदींमार्फत दुधाची निर्मिती होते. मात्र असे असूनही दूध फार काळ सुस्थितीत राहत नाही. दूध अल्प वेळेत खराब होतं. मात्र दूध कंपन्या विक्री करत असलेले दूध (होमोजिनाइज्ड दूध) जवळपास ५-७ दिवस टिकवण क्षमतेचे असते! ते कसे जाणून घेऊया.
होमोजिनाइज्ड दूध म्हणजे ते दूध ज्यामध्ये दुधातील फॅट (सदाशिवकण) चांगल्या प्रकारे मिश्रित केले जातात म्हणजेच फॅटचे मोठे कण छोट-छोटे केले जातात. या प्रक्रियेमुळे दूध जास्त चवदार, गुळगुळीत आणि स्थिर होते. तथापी होमोजिनाइजेशन केल्यानंतर दूध जास्त काळ ताजे राहू शकते.
होमोजिनायझेशन प्रक्रिया कशी होते?
होमोजिनायझेशन म्हणजे एक यांत्रिक प्रक्रिया आहे. ज्यात दूध एका विशेष मशीनमधून जातं. या मशीनमधून दूध मोठ्या दाबात दाबले जातं आणि त्यातल्या फॅटचे मोठे कण छोटे होतात. यामुळे दूध एकसारखं होतं आणि फॅट, पाणी व इतर घटकांमध्ये छान मिसळून राहतं.
दूध दीर्घकाळ टिकू शकते?
होमोजिनायझेशन प्रक्रिया केल्यानंतर दूध जास्त काळ टिकतं. पण, फक्त होमोजिनायझेशन पुरेसं नाही. त्यासाठी पाश्चरायझेशन देखील महत्त्वाचं आहे. पाश्चरायझेशन म्हणजे दूध गरम करून त्यातले सर्व हानिकारक जीवाणू नष्ट करणे.
ज्यासाठी दूध ६५ ते ७५ डिग्री सेल्सियस तापमानावर गरम केले जातं आणि नंतर लगेच थंड केलं जातं. यामुळे दूध जास्त काळ ताजं आणि सुरक्षित राहातं. या दोन्ही प्रक्रियांसह दूध साधारणतः ७ ते १० दिवस ताजं राहू शकतं.
हेही वाचा : कडधान्य खाण्याची सुद्धा असते योग्य पद्धत! जाणून घ्या याच गुणकारी पद्धतीविषयी अधिक माहिती
Web Summary : Homogenized milk stays fresh longer due to fat particle mixing and pasteurization. The process involves breaking down fat globules and heating to eliminate bacteria. This combined process extends shelf life to 7-10 days.
Web Summary : होमोजेनाइज्ड दूध वसा कण मिश्रण और पाश्चराइजेशन के कारण अधिक समय तक ताजा रहता है। इस प्रक्रिया में वसा ग्लोब्यूल्स को तोड़ना और बैक्टीरिया को खत्म करने के लिए गर्म करना शामिल है। यह संयुक्त प्रक्रिया शेल्फ जीवन को 7-10 दिनों तक बढ़ा देती है।