Join us

Gopaalan : 'राजमाते'च्या संगोपनाला गोपालकांचा का आहे नकार जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 13:19 IST

Gopaalan : राज्य सरकारने देशी गायींच्या (cow) संवर्धनासाठी 'राजमाता' चा दर्जा दिला. गोपालकांना देशी गायींचे पालन करण्यासाठी आर्थिक मदत आणि सुविधा देण्यात येते. मात्र, प्रत्यक्षात गोपालकांचा प्रतिसाद अपेक्षेप्रमाणे मिळत नसल्याचे समोर आले आहे. वाचा सविस्तर (Gopaalan)

नागपूर : राज्य सरकारने देशी गायींच्या(cow) संवर्धनासाठी 'राजमाता' चा दर्जा दिला. गोपालकांना देशी गायींचे (cow) पालन करण्यासाठी आर्थिक मदत आणि सुविधा देण्यात येते. मात्र, प्रत्यक्षात गोपालकांचा प्रतिसाद अपेक्षेप्रमाणे मिळत नसल्याचे समोर आले आहे.(Gopaalan)

राज्य सरकारने देशी गायींना(cow) 'राजमाता' घोषित केले आहे. मात्र, गोपालकाला जेव्हा गायीची उपयोगिता नसते, तेव्हा तिला रस्त्यावर सोडून देतात. रस्त्यावर भटकतांना वाहतुकीला होणाऱ्या त्रासामुळे महापालिकेच्या कोंडवाडा विभागाकडून तिला पकडले जाते.(Gopaalan)

पण तिचा गोपालक तिला सोडवायला येत नसल्याने गेल्या ३ वर्षात ७५० गायी (cow) कोंडवाडा विभागाने गोरक्षणकडे पाठविल्या आहेत. ३ वर्षात कोंडवाडा विभागाने २,१९० जनावरांना पकडले असून, यातील ७५० गायींवर कुणीही दावा केलेला नाही.(Gopaalan)

३ वर्षांत २१९० जनावरांना पकडले

* ७५० गायींना पाठविले गोरक्षणात विशेष म्हणजे काही गायी जखमी किंवा आजारी असून त्यांची औषधोपचाराची जबाबदारीही गोपालकांनी झटकली आहे.

* गोपालकांकडून गाय भाकड झाल्यानंतर रस्त्यांवर मोकाट सोडून दिल्या जाते. बऱ्याचदा अपघातात गायीला दुखापत होते. त्याबद्दल कुठलीही संवेदना पशुपालकांना नसल्याचे कोंडवाडा विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येते.

* महापालिकेचा कोंडवाडा विभाग मोकाट जनावरांना पकडल्यानंतर त्यांच्या पशुपालकांची काही दिवस वाट बघतो. त्यानंतर कोंडवाडा विभागाकडून राधाकृष्ण धाम गोरक्षण बिडगाव, उज्ज्वल गोरक्षण ट्रस्ट बहादुरा, गोरक्षण धंतोली, आदर्श जीवनदया केंद्र लकडगंज, राधे गोविंद गोशाळा हिंगणा यांना गायी सुपूर्द केल्या जातात.

* जनावरे जखमी असतील तर त्यांनाही याच गोरक्षणमध्ये उपचारासाठी ठेवले जाते. गेल्या तीन वर्षात ७५० गायी जखमी किंवा विविध आजाराने आजारग्रस्त आहेत. ग्रस्त गायींच्या उपचारासाठीही गोपालक पुढे आले नाही.

१५ लाखांचा दंड

मोकाट जनावरांमध्ये गायीसोबतच म्हैस, बकऱ्या आदी पकडले जाते. २०२२-२३ ते २०२४-२५ या वर्षात महापालिकेने १५,१३,६८४ रुपयांचा दंड वसूल केला. कोंडवाडा विभागाने पकडलेले मोकाट जनावरे घेऊन जाण्यासाठी आलेल्या गोपालकांकडून दंड वसूल करण्यात आला आहे. तरीही मोठ्या प्रमाणात गायी सोडविण्यासाठी गोपालक पुढेच आले नसल्याने गोरक्षणकडे पाठविण्यात आलेल्या गायींच्या संख्येवरून दिसत आहे.

वर्षनिहाय पकडलेली मोकाट जनावरे व गोरक्षणकडे सुपूर्द गायी

वर्षमोकाट जनावरांची संख्यागोरक्षणकडे सुपूर्व जनावरे
२०२२-२३६२४२२७
२०२३-२४८३८२९६
२०२४-२५७२८२२७

हे ही वाचा सविस्तर :Chia Pik: जाणून घेऊयात चियाचे लागवड तंत्र आहे तरी काय?

टॅग्स :शेती क्षेत्रगायशेतकरीशेतीनागपूर