Join us
Daily Top 2Weekly Top 5

गुढीपाडवा, रमजान ईदला 'गोकुळ'कडून २५.४५ लाख लिटर विक्रमी दूध विक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 11:12 IST

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) रमजान ईद व गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर दुधाची विक्रमी विक्री झाली. शनिवारी रमजान ईदला तब्बल २५ लाख ४५ हजार लिटर दुधाची विक्री करण्यात आली. संघाच्या इतिहासातील दूध विक्रीचा नवा उच्चांक आहे.

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) रमजान ईद व गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर दुधाची विक्रमी विक्री झाली. शनिवारी रमजान ईदला तब्बल २५ लाख ४५ हजार लिटर दुधाची विक्री करण्यात आली. संघाच्या इतिहासातील दूध विक्रीचा नवा उच्चांक आहे. गतवर्षीच्या तुलनेत तब्बल १ लाख ८१ हजार ८७७ लिटरने विक्रीत वाढ झाली आहे.

संघाची गुढीपाडव्यादिवशी दूधविक्री १८ लाख लिटर झाली होती; त्याशिवाय श्रीखंड, बासुंदीसह इतर दुग्धजन्य पदार्थांची विक्रीही झाली आहे. दरम्यान, संघाच्या पदाधिकाऱ्यांनी रमजान ईदनिमित्त वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, 'गोकुळ'चे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.

यावेळी कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, मार्केटिंग व्यवस्थापक हणमंत पाटील, प्रशासन व्यवस्थापक रामकृष्ण पाटील, प्रकाश आडनाईक, कैलास मोळक, लक्ष्मण धनवडे, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील तसेच मार्केटिंग विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी, कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

• मुंबई - १२.७३ लाख लिटर• पुणे - ८ लाख लिटर• कोल्हापूर, कोकण - ४.७२ लाख लिटर

रमजान व गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर 'गोकुळ' परिवाराने एकजुटीने काम केले. दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दिलेला सातत्यपूर्ण व दर्जेदार पुरवठा, तसेच अधिकारी व कर्मचारी, वितरकांचे योग्य नियोजन यांमुळेच ही विक्रमी विक्री शक्य झाली. भविष्यात २७ लाख लिटरपर्यंत विक्री वाढविण्याचा मानस आहे. - नविद मुश्रीफ, (अध्यक्ष, गोकुळ).

हेही वाचा : 'व्हाइट कॉलर' नोकरी सोडून उभे केले दुग्ध व्यवसायाचे साम्राज्य; जाणून घ्या काय आहे विशाल यांची यशकथा

English
हिंदी सारांश
Web Title : Gokul Dairy Achieves Record Milk Sales During Gudi Padwa, Ramadan

Web Summary : Gokul Dairy achieved record milk sales of 25.45 lakh liters during Ramadan Eid and Gudi Padwa, a 1.81 lakh liter increase from last year. Mumbai, Pune, Kolhapur and Konkan were the biggest markets. Gokul aims to reach 27 lakh liters in sales.
टॅग्स :गोकुळकोल्हापूरदूधदुग्धव्यवसायशेती क्षेत्ररमजान ईदगुढीपाडवा 2026