सध्या थंडीचे प्रमाण वाढत असून या थंडीच्या लाटेत शेतकरी व पशुपालक यांच्या पशुधनाचे आर्थिकदृष्ट्या नुकसान होऊ नये यासाठी शीत लहरींपासून पशुधनाचा बचाव करणे आवश्यक आहे.
थंडीच्या लाटेत तीव्रतेपासून संरक्षण करणे, अनुषंगिक आजार व मर्तुक नियंत्रीत करण्यासाठी कोणत्या उपाययोजना उपयुक्त आहेत याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
काय करावे◼️ स्थानिक हवामानाच्या अंदाजाची अद्यावत माहिती ठेवावी.◼️ वातावरणातील तीव्र बदलापासून पशुधनाचा बचाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची तयारी करून ठेवावी.◼️ पशुधनाचा थंड वाऱ्यापासून बचाव करण्यासाठी त्याचा निवारा चहू बाजूने आच्छादित करावा, पत्र्याचे छत असल्यास त्यावर वाळलेले गवत अथवा कडब्याचा थर पसरावा.◼️ पशुधनास निवाऱ्यातील जमिनीतील थंडी पासून बचावासाठी वाळलेल्या चाऱ्याचा थर/बिछाना अंथरावा.◼️ पशुधनाचा निवारा शीत ऋतुत जास्त सुर्य प्रकाश पुरविणारा व उन्हाळ्यात सुर्य किरणांच्या तिव्रतेपासून बचाव करणारा असावा.◼️ कडाक्याची थंडी असल्यास निवाऱ्यात कृत्रिम प्रकाश व उष्णता पुरवायची सोय करावी.◼️ अशक्त व आजारी पशुधनास थंडी पासून बचावाकरीता झाकण्यासाठी पोती/बारदान यासारखी सोय असावी. तसेच रात्री सर्व पशुधन उबदार निवाऱ्यात ठेवावे.◼️ पशुधनास ओलाव्यापासून दूर ठेवावे, तसेच उष्णतेसाठी शेकोटी पेटविली असेल तर त्यापासून निघणाऱ्या धूरापासून त्यांचा बचाव करावा, ओलसरपणा ओलावा व धूर यामुळे पशुधनास न्युमोनिया होण्याची शक्यता असते.◼️ पशुधनाच्या शरीराचे तापमान नियंत्रित राहावे यासाठी विशेष करून लहान वयाच्या व अशक्त पशुधनास पेंड व गुळ देण्यात यावे. तसेच त्यांना उबदार जागी ठेवण्याची सोय असावी.◼️ पशुधनासाठी उच्च दर्जाच्या चारा व पशुखाद्याचा मुबलक साठा असावा.◼️ सुधारीत पशुपोषण पध्दती व पुरक खाद्य वापरावेत.◼️ पशुधनास जंत/कृमी नाशके देण्यात यावे.◼️ पशुधनांचा बाह्यपरजीवी किटकांपासून बचाव करण्यासाठी त्यांच्या निवाऱ्यात स्वच्छता ठेवावी.◼️ निरगुडी, तुळस, लेमन ग्रास यांच्या जुड्या गोठ्यात लटकवाव्या, त्या वासाने बाह्य परजीवीं किटक पशुधनाच्या निवाऱ्यात येण्याची शक्यता कमी होते.◼️ निवाऱ्याच्या/गोठा स्वच्छतेसाठी कडूनींबाचा तेल असलेले निर्जंतुकीकरण द्रावण वापरता येईल.◼️ पशुधनाच्या संवर्गानुसार लाळ खुरकुत, घटसर्प, फऱ्या, पीपीआर, आंत्रविषार, इत्यादी रोग प्रतिबंधक लस देण्यात यावी.◼️ पशुखाद्यातून व पाण्यातून पुरेसे क्षार पुरविण्यात यावेत. दुभत्या पशुधनास संतुलित्त आहार व पुरक स्निग्ध खाद्य पुरविण्यात यावेत.◼️ पशुधनाच्या पाणी पिण्याची भांडी स्वच्छ असावीत तसेच पशुधनास दिवसातुन ४ वेळेस कोमट पाणी पिण्यास द्यावे.◼️ सहा महिन्या पुढील गर्भधारणा असलेल्या पशुधनास वाढीव खाद्य द्यावे.◼️ मृत पशुधनाच्या विल्हेवाटीची जागा ही सार्वजनिक जागा व पाणवठ्यापासून दूर असावी. तसेच ती जागा काटेरी कुंपनाने संरक्षित असावी आणि तेथे फलक लावण्यात यावा.
काय करू नये◼️ शीत लहरीच्या काळात पशुधनास उघड्यावर बांधू नये, तसेच मोकाट सोडू नये.◼️ शीत लहरीमध्ये पशु मेळाव्यांचे आयोजन टाळावे.◼️ पशुधनास पिण्यास थंड पाणी देऊ नये.◼️ पशुधनाच्या निवाऱ्यात ओलसरपणा व धूर टाळावा.◼️ रात्री व थंडीत पशुधनास उघड्यावर बांधून ठेऊ नये.◼️ मृत पशुधनाचे शव कुरणावर अथवा चरावयाच्या मार्गात टाकू नये.
अधिक वाचा: 7/12 Download: सातबारा काढण्यासाठी आता तलाठ्याकडे जायची गरज नाही; डाउनलोड करा तुमच्या मोबाईलवर
Web Summary : Protect livestock from cold waves. Provide shelter, warmth, and proper nutrition. Vaccinate animals, maintain hygiene, and prevent exposure to moisture and smoke. Take preventive measures to minimize economic losses to farmers.
Web Summary : पशुधन को शीत लहरों से बचाएं। आश्रय, गर्मी और उचित पोषण प्रदान करें। जानवरों को टीका लगवाएं, स्वच्छता बनाए रखें और नमी और धुएं के संपर्क से बचाएं। किसानों को आर्थिक नुकसान को कम करने के लिए निवारक उपाय करें।