Join us
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाची तीव्रता वाढल्याने पाण्यासाठी जनावरांची वणवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2024 16:15 IST

पाण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे. उष्णतेमुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याने पाण्याची पातळी घटत चालली आहे. त्यात परिसरातील विहिरींनी देखील तळ गाठला आहे.

पाण्यासाठी जनावरांची वणवण होत आहे. यातच डाव्या कालव्याला पाणी नसल्याने परिसरातील पाणीपातळी ही कमी होत चालली आहे. शेतकऱ्यांना पिकांना देण्यासाठी पाण्याची कमतरता व जनावरांना पाटबंधारे विभाग जायकवाडी धरणातून शेतीसाठी तीन वेळा पाणी 3 सोडणार होते. त्यातील दोन पाणी पाळी सोडण्यात आलेल्या आहेत. एप्रिल महिन्यात तिसरे पाणी मिळणार आहे.

सध्या डाव्या कालव्याला परळी औष्णिक वीज केंद्रासाठी सोमावारी पाणी सोडले असून शेतीसाठी कधी पाणी सुटणार, अशी विचारणा शेतकरी करत आहेत. डाव्या कालव्यात पाणी येण्यासाठी शेतकरी प्रतीक्षा करत आहेत.

पिण्यासाठी पाणी नसल्याने शेळ्या व इतर जनावरे हे डाव्या कालव्यात साचलेल्या डबक्यातील पाण्यावर तहान भागवत आहेत. उन्हाची तीव्रता जास्त असल्याने जनावरे दुपारी सावलीचा आधार घेत आहेत. ऊन जास्त असल्याने पिकांना देखील अधिक पाणीर द्यावे लागत आहे. कालव्यामध्ये पाटबंधारे विभागाकडून पाणी सोडण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :पाणीपाणीकपातदुग्धव्यवसाय