Join us

Animal Care : आता आजारी जनावरे ओळखा झटपट; आर्थिक फायद्यासह होईल वेळीची बचत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 19:26 IST

Animal Care : सशक्त आणि आजारी जनावरांतील फरक हे वेळेत लक्षात येणे महत्त्वाचे आहे कारण यामुळे आर्थिक तोटा कमी होत असतो. याच अनुषंगाने आज आपण जाणून घेणार आहोत सशक्त आणि आजारी जनवारांतील आणि लक्षणे ज्यांच्या अंदाजवरून पशुपालक वेळीच आजारांचे निदान करून गुरांवर उपचार करू शकतात.   

सशक्त आणि आजारी जनावरांतील फरक हे वेळेत लक्षात येणे महत्त्वाचे आहे कारण यामुळे आर्थिक तोटा कमी होत असतो. याच अनुषंगाने आज आपण जाणून घेणार आहोत सशक्त आणि आजारी जनवारांतील आणि लक्षणे ज्यांच्या अंदाजवरून पशुपालक वेळीच आजारांचे निदान करून गुरांवर उपचार करू शकतात.   

सशक्त जनावरांचे शरीर निरोगी आणि ताकदवान असते, त्यांचा आहार आणि इतर शारीरिक क्रिया योग्य प्रमाणात चालू राहतात. याउलट, आजारी जनावरांमध्ये कमजोरी, अशक्तपणा आणि विविध शारीरिक विकार दिसून येतात.

त्यांच्या शरीराची प्रतिकारशक्ती कमी होऊन ते वेगवेगळ्या रोगांची शिकार होतात. परिणामी आजारी जनावरांचे वजन कमी होऊ शकते. ज्यामुळे आर्थिक तोटा संभवतो. यासाठी पुढील काही लक्षणांवरून आपण आजारी गुरांची ओळख करू शकतात.

सशक्त व आजारी जनावरांतील फरक 

अ.क्र.अवयवसशक्तरोगी
१ नाकावर घामाचे थेंबअसतातनाक कोरडे असते
२ कानाची खालची पाकळीसामान्य तापमानगरम
३ दूधनेहमीप्रमाणेकमी दह्यासारखे, रक्त/पू मिश्रित
४ चालणेनेहमीप्रमाणेलंगडते
५ उठणे बसणेन अवघडता क्रिया करतातअवघडून क्रिया करतात
६ खाणेव्यवस्थित खातातचाखत माखत अपूर्ण खातात
७ लघवीनेहमीप्रमाणे (फिकट पिवळसर)लाल/कॉफी रंगाची असते
८ बळस (सोट)घट्ट काचेचा असतोपातळ पांढऱ्या रंगाचा शेम्बडासारखा असतो
९ शेणएकावर एक थर असतातलांब पसरलेले फेस, बुडबुडे जास्त असतात
१० डोळ्यांच्या पापणीची आतील बाजूतांबूस असतेपांढरट, पिवळट असते
११ अंगावर केसांची प्रतनरम, तलम, चमकदार असतेकोरडे, कुरळे, निस्तेज असते
१२ कास व सडनिरोगी असतेगरम, सूज आलेली असते

हेही वाचा : Benefits of Mineral Mixture : आता गोळी न देता गाई येतील माजावर फक्त त्यानं दररोज खाऊ घाला खनिज मिश्रणाची पावडर

टॅग्स :दुग्धव्यवसायगायदूधशेतीशेतकरीशेती क्षेत्र