इंदापूर : सोनाई ग्रुपने १ सप्टेंबरपासून dudh kharedi dar दुधाच्या खरेदी दरात प्रति लिटर एक रुपयाने वाढ जाहीर केली आहे.
यामुळे ३.५ फॅट आणि ८.५ एसएनएफ असलेल्या दुधाचा खरेदी दर आता ३५ रुपये प्रति लिटर झाला आहे, अशी माहिती सोनाई ग्रुपचे अध्यक्ष दशरथ माने यांनी पत्रकारांना दिली.
माने यांनी सांगितले की, दुधाचा दर हा देश आणि जागतिक बाजारपेठेतील दुग्धजन्य पदार्थांचा बाजारभाव, मागणी आणि पुरवठ्यावर अवलंबून असतो.
सोनाई ग्रुपने नुकतीच स्कीम मिल्क पावडर, होल मिल्क पावडर, डेअरी व्हाइटनर पावडर निर्मिती करणाऱ्या पावडर प्लांटची सुरुवात केली आहे.
याशिवाय रेनेट केसिन,अॅसिड केसिन, सोडियम केसिन, ४०, ७० आणि ८० टक्के व्हे प्रोटीन पावडर, फार्मा आणि इडेबल लॅक्टोज पावडर, परमिट पावडर, बटर ऑईल, चीज, अल्ट्रा हाय ट्रीटमेंट क्रीम दूध, फ्लेवर मिल्क आणि इतर दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
ही उत्पादने देशभरातील बाजारपेठेत विकली जात असून, अनेक देशांमध्ये निर्यातही होत आहेत. माने यांनी सांगितले की, भविष्यातही सोनाई ग्रुप दूध उत्पादकांना जास्तीचा दर आणि वेळेवर पेमेंट देण्यासाठी कटिबद्ध आहे.
शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने जनावरांचे पालनपोषण करून शुद्ध आणि जास्तीचे दूध उत्पादन करावे, असे आवाहन त्यांनी केले. शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन हा उत्तम पर्याय आहे.
सोनाई ग्रुप दूध उत्पादकांना मार्गदर्शन, योग्य बाजारभाव, वेळेवर पेमेंट, बँक आणि पतसंस्थांमार्फत कर्जपुरवठा, दर्जेदार पशुखाद्य, मक्याला योग्य भाव आणि त्वरित पेमेंट अशा सुविधा यापुढेही अधिक तत्परतेने पुरवण्यासाठी कटिबद्ध आहे.
शेतकऱ्यांसाठी सुविधा आणि रोजगाराच्या संधी◼️ शेतकऱ्यांच्या हितासाठी सोनाई ग्रुपने अनेक उपाययोजना केल्या आहेत. दर्जेदार पशुखाद्य निर्मिती प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना परिपूर्ण पशुखाद्य उपलब्ध करून देण्यात येत आहे, ज्यामुळे जनावरांचे दूध उत्पादन वाढते.◼️ तसेच शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मक्याला योग्य भाव आणि त्वरित पेमेंट सुविधा प्रदान केली जाते.◼️ याशिवाय, ८०० मेट्रिक टन क्रशिंग क्षमता असलेला सोलवंट प्लांट आणि रिफायनरी प्रकल्प कार्यान्वित असून, सोयाबीनला योग्य बाजारभाव आणि त्वरित पेमेंट मिळते. या सर्व उपक्रमांमुळे हजारो युवक आणि महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.
अधिक वाचा: 'आयटी'तील नोकरी सोडून हिंगणगावचा रणजीत रमला ७० एकर शेतीत; वाचा सविस्तर