Join us
Daily Top 2Weekly Top 5

बैलजोडीला मिळतोय लाखोंचा दर; जनावरांच्या बाजारात खरेदी विक्री वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 10:44 IST

पाचोड येथील जनावरांचा बाजार मराठवाड्यात प्रसिद्ध आहे. रविवारी भरलेल्या आठवडी बाजारात पाचशेपेक्षा अधिक बैलजोड्या आल्या होत्या.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पाचोड येथील जनावरांचा बाजार मराठवाड्यात प्रसिद्ध आहे. रविवारी भरलेल्या आठवडी बाजारात पाचशेपेक्षा अधिक बैलजोड्या आल्या होत्या.

कमीत कमी ५० हजार रुपये आणि जास्तीत जास्त एक लाख रुपयांपर्यंत बैलजोडी बाजारात विकली गेली. यामुळे बाजारात लाखो रुपयांची उलाढाल झाली.

पैठण तालुक्यातील पाचोड येथील मोसंबीपाठोपाठ जनावरांचा बाजार मराठवाड्यात प्रसिद्ध आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील हाळीचा येथील बाजार मराठवाड्यात क्रमांक एकचा असून, दुसरा क्रमांक पाचोडचा आहे.

पाचोड येथील बाजारात छत्रपती संभाजीनगरसह जालना, बीड जिल्हा परिसरातून शेतकरी बैलजोड्यांसह इतर जनावरे विक्रीला आणतात.

सध्या अनेक भागात रब्बी पिकाची काढणी झालेली आहे. तसेच अनेक साखर कारखान्यांचे गळीत हंगाम संपलेले आहेत. यामुळे बैलजोडीची गरज भासत नसल्याने रविवारी येथील बाजारात अनेक शेतकऱ्यांनी पाचशे पेक्षा अधिक बैलजोड्या विक्रीसाठी आणल्या होत्या.

कमीत कमी ५० हजार रुपये, तर जास्तीत जास्त एक लाख रुपयांपर्यंत बैलजोडी विकली गेली. यामुळे बाजारात लाखो रुपयांची उलाढाल झाली.

एक बैलजोडी विक्रीसाठी आणली होती. माझी बैलजोडी एक लाख रुपयांना मागितली होती. परंतु, विकली नाही. - जिजा भुमरे, शेतकरी, पाचोड जि. छत्रपती संभाजीनगर.

पाचोड येथील आठवडी बाजारात पाचशेपेक्षा अधिक बैलजोड्यांसह इतर जनावरे विक्रीसाठी आले होते. एक बैलजोडी ५० हजारपासून एक लाख रुपयांपर्यंत बाजारात विकली गेली आहे. अजून बैलाजोडीचे दर वाढणार आहेत. - सत्तार गफ्फार शेख, व्यापारी, रांजणगाव दांडगा जि. छत्रपती संभाजीनगर.

हेही वाचा :  सरकी ढेप, तूर तेजीत तर खाद्यतेलासह सोन्या-चांदीत मंदी; वाचा बाजार आढावा

टॅग्स :दुग्धव्यवसायशेतकरीशेतीशेती क्षेत्रमराठवाडाबाजार