Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >कृषी पर्यटन > Ranzopdi Agro Tourism : सुरगाण्याच्या इंजिनिअर तरुणाची कृषी पर्यटन घडवणारी 'रानझोपडी', वाचा यशोगाथा 

Ranzopdi Agro Tourism : सुरगाण्याच्या इंजिनिअर तरुणाची कृषी पर्यटन घडवणारी 'रानझोपडी', वाचा यशोगाथा 

Latest News young engineer harshal thavil from Surgana Ran Jhopdi is creating agri-tourism, read success story | Ranzopdi Agro Tourism : सुरगाण्याच्या इंजिनिअर तरुणाची कृषी पर्यटन घडवणारी 'रानझोपडी', वाचा यशोगाथा 

Ranzopdi Agro Tourism : सुरगाण्याच्या इंजिनिअर तरुणाची कृषी पर्यटन घडवणारी 'रानझोपडी', वाचा यशोगाथा 

Ranzopdi Agro Tourism : सुरगाणा (Surgana) सारख्या अतिदुर्गम भागातील हर्षलने गावच्या मातीतच 'कृषी पर्यटनाचा' (Agro Tourism) नवा मार्ग शोधला आहे. 

Ranzopdi Agro Tourism : सुरगाणा (Surgana) सारख्या अतिदुर्गम भागातील हर्षलने गावच्या मातीतच 'कृषी पर्यटनाचा' (Agro Tourism) नवा मार्ग शोधला आहे. 

शेअर :

Join us
Join usNext

- गोकुळ पवार 

Ranzopdi Agro Tourism : आज गलेलठ्ठ पगाराची नोकरी म्हटली कि कुणीही ना म्हणत नाही. अनेकजण उच्च शिक्षण घेऊन भविष्याच्या दृष्टीने नोकरी करणे पत्करतात. शिवाय ग्रामीण भागातील एखादा तरुण शिक्षण घेऊन नोकरीला लागला तर त्याच मोठं कौतुक होतं, पण उच्च शिक्षण घेऊन, पुन्हा इतर परीक्षांसाठी शंभर टक्के मेहनत घेऊन अपयश आलं तर माणूस खचतोच, पण सुरगाणा (Surgana) सारख्या अतिदुर्गम भागातील तरुणाने गावच्या मातीतच 'कृषी पर्यटनाचा' (Agro Tourism) नवा मार्ग शोधला आहे. 

नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) आदिवासी भागातील सुरगाणा तालुक्यातील गारमाळ गावातील हर्षल थविल (Harshal Thavil) या ध्येयवेड्या तरुणाची ही गोष्ट. सुरगाण्यासह त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ आदी आदिवासी बहुल तालुक्यात आजही रोजगाराची दयनीय अवस्था आहे. एकीकडे या तालुक्यांना निसर्गाने भरभरून दिले आहे. पण निसर्ग सौंदर्याने (Nature) पोट कसं भरायचं, हा प्रश्न घेऊन येथील काही युवक शिक्षण घेऊन नोकरी करतात, तर काहींच्या नशिबी शेती व्यवसाय येतो. याच दुर्गम भागात हर्षलचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षणापासून ते बारावीपर्यंतचे शिक्षण त्याने तालुक्यातच केले. 

हर्षलने बारावीनंतर मॅकेनिकल इंजिनिअरिंग करण्याचा निर्णय घेत कोल्हापूर गाठले. शिवाय दोन वर्षांचा डिप्लोमा करत याच दरम्यान स्पर्धा परीक्षांच्या ध्येयाने त्याला पछाडलं. पण दोन वर्षे मेहनत घेऊनही यश आले हाती आले नाही. शेवटी स्पर्धा परीक्षांच्या मृगजळात न गुरफटता हर्षलने घरची वाट धरली. घरची शेती असल्याने शेतीत काही नवं करण्याचा प्रयत्न करण्यास सुरवात केली. 

सुरगाणा तालुक्याला मुळातच निसर्गाचे कोंदण लाभलेलं आहे. याच निसर्गाचं रोजगारात रूपांतर केलं तर? असे प्रश्न हर्षलला सतावू लागले. घरी येण्यापूर्वी हर्षलने योगा शिकण्यावर भर दिला होता. त्याच म्हणणं होत की, 'कमी गरजातंही सुखाने जगता येऊ शकतं,' ही एक ओळ रानझोपडी साकारण्यासाठी पुरेशी ठरली. मग सुरू झाला रानझोपडी साकारण्याचा प्रवास. 

जिथं एकही झाडं नव्हतं... 
गारमाळ या गावाला लागूनच हर्षल थविल यांची वडिलोपार्जित शेती आहे. शिवाय नदीही जवळच आहे. पण या परिसरात खूपच कमी झाड होती. हर्षलने सुरवातीला आयुर्वेदिक झाडं, रानभाज्या लावण्यास सुरवात केली. आज रानझोपडी परिसरात असंख्य झाडे आहेत. यात स्थानिक झाडांपासून ते जंगली, परदेशी झाडांचा समावेश आहे. सुरवातीला झाडांची लागवड केल्यानंतर स्थानिक परिसरातील नागरिक बघण्यासाठी येऊ लागले. आज रानझोपडीला सुरु करून चार वर्षे झाली असून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची मान्यताही लाभलेली आहे. 

सध्या इथं काय पाहायला मिळतंय... 
इथं सुरवातीपासून ते शेवटपर्यंत झाडंच झाड दिसून येतात. कॉफी, कोको, एवोकाडो, गुलाबी फणस, सोरसुप, करवळ दुर्मिळ झाड, रानकेळी, मँगो स्टीन यासारखे असंख्य झाडे दिसून येतात. शिवाय कमळाचे वेगवेगळे प्रकार, रानभाज्या, आयुर्वेदिक झाडही आहेत. हर्षल सांगतो, 'जिथं भेटीला जायचो तिथून आणायचो किंवा ऑनलाइन झाड मागवायचो'. याचबरोबर आता रानझोपडीत छोटी छोटी तळी, वारली पेंटीग्जचा अनोखा नमुना, कौलारू घरे इत्यादी इथे पाहायला मिळते. 

सगळ्यात भारी जागा 
गेल्या दोन वर्षांपासून पर्यटकांचा ओघ वाढत असून आतापर्यंत अडीच हजार पर्यटकांनी भेट दिल्याचे हर्षल सांगतात. शिवाय नाशिकचं नाही तर मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर शहरातून पर्यटक येतात. याच पर्यटकांचा अभिप्राय होता की मुक्कामाची सोय असल्यास आणखी सोयीस्कर होईल, या दृष्टीने दोन मड हाऊस बांधण्यात आले आहेत. येथील वातावरण पाहून, 'सगळ्यात भारी जागा, अजून अशी जागा पाहिली नाही!' अशी प्रतिक्रिया पर्यटक देतात. 

हर्षलची वारली पेंटींग 
हर्षलने रानझोपडी उभारली, पण रानझोपडीच्या सजावटीसाठी कुणाचीही मदत घेतली नाही. कारण तो स्वतःच अतिशय उत्तमरीत्या वारली पेंटींग साकारतो. लहानपणापासूनची आवड आज रानझोपडीसाठी कामी आली. रानझोपडीत गेल्यानंतर आपलं स्वागतच सुंदर अशा वारली पेंटींगने होत असते. येथील सजावटीसाठी खूप चांगला उपयोग झाला, पर्यटकांना आवडू लागले असल्याचे हर्षलने सांगितले. 
 

Web Title: Latest News young engineer harshal thavil from Surgana Ran Jhopdi is creating agri-tourism, read success story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.