Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >कृषी पर्यटन > कृषी पर्यटन नेमकं कसं असावं, आवश्यक गोष्टी काय? वाचा सविस्तर 

कृषी पर्यटन नेमकं कसं असावं, आवश्यक गोष्टी काय? वाचा सविस्तर 

Latest News What are the qualifications for agritourism business? see detail's | कृषी पर्यटन नेमकं कसं असावं, आवश्यक गोष्टी काय? वाचा सविस्तर 

कृषी पर्यटन नेमकं कसं असावं, आवश्यक गोष्टी काय? वाचा सविस्तर 

राज्यातील अनेक शेतकरी या व्यवसायाकडे वळू लागले असून कृषी पर्यटन जिव्हाळ्याचा विषय होऊ लागला आहे.

राज्यातील अनेक शेतकरी या व्यवसायाकडे वळू लागले असून कृषी पर्यटन जिव्हाळ्याचा विषय होऊ लागला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कृषि पर्यटन केंद्र कार्यरत आहेत. राज्यातील अनेक शेतकरी या व्यवसायाकडे वळू लागले असून कृषी पर्यटन जिव्हाळ्याचा विषय होऊ लागला आहे. त्याचबरोबर अनेक तरुण देखील कृषी पर्यटन सुरु करत आहेत. अशा वेळी राज्य शासनामार्फत कृषि पर्यटनास प्रोत्साहन देण्याची गरज आहे आणि त्यासाठीच कृषि पर्यटन धोरण ठरविण्यात आले आहे. त्यानुसार कृषी पर्यटनाचा नेमका उद्देश मांडण्यात आला आहे. 

दरम्यान आज महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी कृषी पर्यटन होऊ लागले आहे. या कृषी पर्यटनाच्या माध्यमातून अनेक गोष्टीचा उहापोह या निमित्ताने होत आहे. त्यानुसार कृषि पर्यटनातून ग्रामीण विकास आणि ग्रामीण विकासातून राज्याचा विकास साधणे, कृषि पर्यटनाच्या माध्यमातून शेती उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करुन देणे, कृषि पर्यटनाला कृषि पुरक व्यवसाय म्हणून प्रोत्साहन देणे, ग्रामीण भागातील लोककला आणि परंपरा शहरी भागात पोहोचविणे ग्रामीण तरुणांना गावातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे, तसेच 

ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे, शहरी भागातील लोकांना/विद्यार्थ्यांना शेती आणि शेती पध्दती तसेच कृषि संलग्न व्यवसाय यांची माहिती उपलब्ध करुन देणे, कृषि पर्यटनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील राहणीमान उंचावणे, शहरी भागातील जनतेस प्रदुषणमुक्त, शांत व निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याचा अनुभव देणे, शेतावरील कृषि मालाच्या प्राथमिक प्रक्रियेस प्रोत्साहन देणे. ग्रामीण भागातील पडीक, गायरान आणि क्षारपड जमिनी उपयोगात आणणे. पर्यटकांना प्रत्यक्ष शेतातील कामाचा अनुभव देणे


कृषि पर्यटनासाठी बंधनकारक बाबी

खेडेगाव : कृषि पर्यटन केंद्र हे शहराच्या हद्दीपासून किमान ५ कि.मी. बाहेर आणि शक्यतो खेडेगावामध्ये असावे.
शेती : कृषि पर्यटन हे शेती आणि शेती संलग्न बाबींवरच आधारित असल्यामुळे शेती हा महत्वाचा घटक आहे. कृषि पर्यटन सुरु करण्यासाठी कोकण विभागाकरीता कमीतकमी १ एकर किंवा त्यापेक्षा जास्त व उर्वरीत महाराष्ट्राकरीता कमीत कमी ५ एकर व त्यापेक्षा जास्त शेती असणे आवश्यक आहे. सदर ठिकाणी २४ तास पाण्याची सुविधा असणे आवश्यक आहे. कृषि पर्यटन केंद्राअंतर्गत राहण्याकरीता उभारण्यात येणान्या खोल्या ह्या RCC बांधकामात असू नयेत. सदरच्या खोल्या ह्या पर्यावरणपुरक असाव्यात. उदा. लाकूड, बांबू, जांभा दगड, झोपडी वजा असाव्यात.
कृषि पर्यटन केंद्राकरीता महिला बचत गटांना प्राधान्य देण्यात येईल.

शेतकरी : पर्यटन केंद्र चालविणारी व्यक्ती ही स्वतः त्याच ठिकाणी शेती करणारा शेतकरी असावा तसेच सदर शेती त्याच्या स्वतःच्या अथवा त्याच्या कुटुंबातील सदस्याच्या नावे असणे आवश्यक आहे.
पर्यटक निवास स्थान : पर्यटक निवासस्थान हे शेतीच्या ठिकाणीच असणे बंधनकारक आहे. जास्तीत जास्त ८ खोल्या असाव्यात. (प्रत्येक खोली किमान १५x१०' आकाराची असावी) प्रत्येक खोलीस जोडलेले संडास, बाथरुम आवश्यक राहील. सदर पर्यटक निवासस्थानाचे बांधकाम हे शक्यतो पर्यावरणपूरक असावे व त्यास सक्षम प्राधिका-याची परवानगी आवश्यक आहे. शालेय सहलीसाठी अथवा मोठया समूहासाठी जास्तीत जास्त ०२ लोकनिवास (Dormitary) बांधता येतील. परंतू त्याकरीता किमान ५ एकर क्षेत्र असणे बंधनकारक राहील.
कृषि पर्यटन केंद्र चालविण्यासाठी पर्यटन संचालनालयाच्या नोंदणी प्रमाणपत्र घेणे तसेच आवश्यक त्या इतर सर्व विभागांच्या परवानग्या घेणे बंधनकारक राहील.
अति तात्काळ वैद्यकीय सेवा उपलब्ध होण्यासाठी फस्ट एड बॉक्स (First Aid Box) पर्यटन केंद्राच्या ठिकाणी ठेवण्यात यावा.

आदर्श पर्यटन केंद्राकरीता इतर अनुषंगिक बाबी

पर्यटन केंद्र हे शांत, सुंदर अशा ठिकाणी असावे. गर्द झाडी, नद्या, नाले आसपास असावेत.
पर्यटन केंद्राच्या ठिकाणी एकाचवेळी विविध पिक पध्दतींचा अवलंब केला गेला असावा. जेणेकरुन पर्यटकांना अशा शेतीतील विविधतेचा अनुभव घेता येईल. उदा. अन्नधान्य, भाजीपाला, फळबागा, फुलशेती, रोपवाटीका इ.
पर्यटन केंद्रावर घरगुती पध्दतीची रुचकर भोजन व्यवस्था असावी.
ग्रामीण जीवनाचा अनुभव देण्यासाठी बैलगाडी, घोडागाडी, शेतीवरील विविध हंगामातील कामे दाखविण्याची सोय असावी.
पर्यटन केंद्रावर ग्रामीण खेळ खेळण्याची सुविधा उपलब्ध करावी. उदा. विटीदांडू, हुतूतू, लंगडी, झोका
पर्यटन केंद्रावर ग्रामीण व पारंपारिक मनोरंजन विषयक कार्यक्रमाची व्यवस्था असावी. उदा. पोवाडा, गोंधळ जागरण, गजेनृत्य, लेझिम, भजन-किर्तन, आदिवासी नृत्य इ.
पर्यटन केंद्राच्या परिसरात किल्ला, गिर्यारोहण, तलाव, नदी इ. निसर्गरम्य ठिकाणे असल्यास त्यासोबत मार्गदर्शन केंद्र चालकाने पर्यटकांना करा.

 

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

Web Title: Latest News What are the qualifications for agritourism business? see detail's

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.