Join us

खोडवा ऊस व्यवस्थापनातील चार कामे एकाच वेळी करणारे औजार; पाहूया सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 09:34 IST

kodwa us niyojan भाकृअनुप-भारतीय ऊस संशोधन संस्था, लखनऊ यांच्या द्वारा विकसित केलेले औजार खोडव्याची उत्पादकता यापेक्षा जास्त वाढविण्यासाठी सुधारीत करण्यात आले आहे. त्यास सोर्फ असे संबोधले जाते. 

ऊस हे भारतातील एक महत्वाचे नगदी पीक असल्यामुळे देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत झाली आहे. भारतात उसाखालील क्षेत्र ५० लाख हेक्टर इतके आहे तसेच सरासरी उत्पादन जवळजवळ ७० टन प्रति हेक्टर आहे.

जवळजवळ ५०० लाख ऊस शेतकरी आणि त्यांचे कुटुंबिय दैनंदिन उपजीविकासाठी उसाच्या शेतीवर आणि साखर उद्योगाशी थेट जोडलेले आहे.

भारतात सरासरी उत्पादकता ही मुख्य पिकाच्या तुलनेत सामान्यतया २०-२५ टक्के कमी आहे आणि दरवर्षी एकूण क्षेत्रफळाच्या जवळजवळ निम्मे क्षेत्र ऊस खोडवा पिकासाठी घेतले जाते. त्यासाठी प्रथम खोडवा उसाचे उत्पादन वाढविणे अति आवश्यक आहे.

खोडवा उसाच्या अधिक उत्पादनात फुटवा मरण्याची संख्या, अन्नद्रव्यांची कमतरता आणि पाचट जाळणे इ. प्रमुख मर्यादा आहेत.

ह्या गोष्टी लक्षात ठेवून भाकृअनुप-भारतीय ऊस संशोधन संस्था, लखनऊ यांच्या द्वारा विकसित केलेले औजार खोडव्याची उत्पादकता यापेक्षा जास्त वाढविण्यासाठी सुधारीत करण्यात आले आहे. त्यास सोर्फ असे संबोधले जाते. 

सोर्फ अवजाराची मुख्य वैशिष्ट्ये Root pruner cum Fertilizer drill (SORF)हे औजार पुढील चार कामे एकाच वेळी करण्यास सक्षम आहे१) अन्नद्रव्य व्यवस्थापनसोर्फ औजार, पृष्ठभागावर पाचट असलेल्या जमिनीत रासायनिक खतांना खोडव्याच्या मुळाजवळ देते. २) बुडका व्यवस्थापनहे औजार, ऊस तोडल्यानंतर उर्वरित असमान बुडक्यांना पृष्ठभागाजवळ एक समार आधारावर कापते. ३) वरंब्याच्या बाजू फोडणे (ऑफ-बारींग)ह्या औजाराद्वारे ऊसाच्या जुन्या वरंब्याची माती अंशतः बाजूला असलेल्या दोन वरंब्यामध्ये असलेल्या पाचटावर टाकली जाते त्यामुळे पाचटाचे जलद विघटन होते. ४) मुळ व्यवस्थापन सोर्फ औजाराद्वारे खोडव्यांच्या जुन्या मुळांना कापले जाते, परिणामी नवीन मुळे वाढतात, पाणी आणि अन्नद्रव्यांचे शोषण होते, ज्यामुळे खोडव्यांच्या फुटव्यांची संख्या आणि उत्पादकता वाढण्यास मदत होते. 

सोर्फ औजाराच्या वापरामुळे होणारे प्रमुख फायदे१) खोडवा उसाचे उत्पादन वाढवण्यासाठी पिक पद्धतीचे वेळवर नियोजन.२) पाचट असलेल्या जमीनीतही रासायनिक खतांचे व्यवस्थापन शक्य. ३) चांगल्या फुटव्यांच्या संख्यांमध्ये वाढ आणि फुटव्यांच्या मर संख्येत घट. ४) खोडवा उसाच्या उत्पादन क्षमतेत ३० टक्के पर्यंत वाढ. ५) प्रति हेक्टर ५०,००० रु. पर्यंत निव्वळ नफा. ६) लाभ खर्चाच्या प्रमाणामध्ये १२.६ टक्के पर्यंत वाढ. ७) पाण्याच्या कार्यक्षमतेत ३९ टक्के पर्यंत वाढ. ८) रासायनिक खत-नायट्रोजन ग्रहण कार्यक्षमतेत १३ टक्के पर्यंत वाढ.९) उसाची मुळे कापल्यामुळे जास्त प्रमाणात निरोगी मुळांचा विकास होतो त्यामुळे पिकांना अल्पकालीन पाण्याचा ताणाच्या प्रभावापासून प्रतिबंधित करण्यास मदत मिळते.१०) पर्यावरणास फायदेशीर (रासायनिक खत-नायट्रोजन जमिनीमध्ये स्थापन केल्यामुळे अमोनियाचे उत्सर्जन कमी होते, आणि पाचट जाळल्यामुळे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम टाळले जावू शकतात). 

भाकृअनुप-राष्ट्रीय अजैविक स्ट्रैस प्रबंधन संस्थानमाळेगाव, बारामती पुणे

टॅग्स :ऊसपीकपीक व्यवस्थापनलागवड, मशागतबारामतीशेतकरीशेती