रत्नागिरी: लाह्या खाण्याचे अनेक फायदे आहेत. लाह्या पचायला हलक्या, शरीराला थंडावा देणाऱ्या किंवा वजन कमी करत असल्याने लाह्यांना मागणी अधिक आहे.
मात्र लाह्या तयार करण्यासाठी भाजणे, कुटणे या प्रक्रिया खर्चिक कष्टदायक आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातर्फे स्वयंचलित सतत उष्ण हवा झोत असलेले लाह्या निर्मिती यंत्र विकसित करून मानवी श्रम कमी केले आहेत.
लाह्या खाण्यासाठी फायदेशीर असल्यामुळे त्यासाठी मागणीही वाढली आहे. नाचणी, वरी, भात, ज्वारी, बाजरी, मका राजगिरा यासारख्या विविध धान्यांपासून लाह्या तयार करण्यात येतात.
यंत्रामुळे लाह्या तयार करणे सुलभ झाले आहे. त्यामुळे लाह्या व्यावसायिकांसाठी हे यंत्र फायदेशीर ठरणार आहे. वेळ, श्रम, पैसा याची बचत होणार असून वापरण्यास सुलभ आहे.
भाजणे, कुटणे झाले कालबाह्य◼️ लाह्या करण्यासाठी धान्य भिजवणे, भाजणे नंतर उखळात कुटणे यासारख्या प्रक्रिया कराव्या लागतात.◼️ त्यासाठी वेळ श्रम, पैसा लागतो. मात्र स्वयंचलित यंत्रामध्ये धान्य टाकले असता, लाह्या तयार होऊन बाहेर पडतात.◼️ शिवाय कोंडा वेगळा होत असल्याने शुद्ध लाह्या मिळतात.
स्वयंचलित यंत्र, वापर सुलभ◼️ हे यंत्र स्वयंचलित असल्यामुळे एका अर्ध कुशल कामगाराच्या सहाय्याने चालविता येते.◼️ या यंत्राचा आकार लहान असल्यामुळे कमी जागेत बसवता येते.◼️ बाहेरुन पूर्णतः उष्मा प्रतिरोधी आवरण असल्यामुळे काम करणाऱ्या व्यक्तीला उष्णतेचा त्रास होत नाही.◼️ गरम हवेचा वापर करून लाह्या निर्मिती केली जाते.◼️ सतत धान्य भरून त्यापासून एक सारखी लाह्यांची निर्मिती शक्य होते.
अधिक वाचा: सातबारा उताऱ्यावर आता पतीसोबत येणार पत्नीचेही नाव; काय आहे योजना? वाचा सविस्तर
Web Summary : Konkan Agricultural University has developed a machine for making puffed grains from various cereals like rice and millet. This reduces labor, saves time and money for producers, and simplifies the process of producing healthy puffed grains.
Web Summary : कोंकण कृषि विश्वविद्यालय ने चावल और बाजरा जैसे विभिन्न अनाजों से लाई बनाने के लिए एक मशीन विकसित की है। इससे श्रम कम होता है, उत्पादकों के लिए समय और धन की बचत होती है, और स्वस्थ लाई बनाने की प्रक्रिया सरल हो जाती है।