Join us

अवघ्या ४५ मिनिटांत उसाचा एक ट्रेलर भरणार; शेतकरीपुत्राने तयार केले 'हे' ऊस भरणी यंत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 19:03 IST

us bharani yantra दरवर्षीच गाळप हंगामात उसाच्या वाहतुकीची मोठी समस्या असते. कारण, कामगार टंचाईमुळे ऊस वाहतूक वेळेत होत नाही. परिणामी साखर कारखान्यांना अडचणींचा सामना करावा लागतो.

नितीन काळेलदरवर्षीच गाळप हंगामात उसाच्या वाहतुकीची मोठी समस्या असते. कारण, कामगार टंचाईमुळे ऊस वाहतूक वेळेत होत नाही. परिणामी साखर कारखान्यांना अडचणींचा सामना करावा लागतो.

ही समस्या लक्षात घेऊन सातारा तालुक्यातील रामकृष्णनगरच्या सनी दिलीप काळभोर या शेतकरीपुत्रानेऊस भरणी यंत्राची निर्मिती केली आहे. या यंत्राद्वारे दिवसात ७० ते ७५ टन ऊस भरला जात आहे.

सातारा जिल्ह्यात १५ हून अधिक साखर कारखाने आहेत. दरवर्षी ऑक्टोबर महिन्यापासून कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होतो; पण अनेक वेळा ऊसतोड मजुराची समस्या निर्माण होते. याचा फटका शेतकऱ्यांना, तसेच साखर कारखानदारांनाही बसतो. पुरेसे गाळप होत नाही.

अडचणी येत असतात. यावर प्रभावी मार्ग काढण्याचे काम रामकृष्णनगर येथील सनी काळभोर यांनी केले आहे. त्यांनी यंत्राची निर्मिती केली आहे. त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे. सनी काळभोर यांनी ट्रेलरमध्ये ऊस भरण्याच्या उद्देशाने यंत्र तयार केले आहे.

यासाठी २०२० पासून प्रत्यक्ष काम सुरू केले, तसेच यंत्र तयार करतेवेळी किमान जागेत बसणारे, सहज वाहतूक करण्यायोग्य असले पाहिजे याकडे प्राधान्याने लक्ष ठेवण्यात आले, तसेच या यंत्राचे आरेखन आणि निर्मितीसाठी चार महिने लागले.

स्थानिक पातळीवर उपलब्ध लोखंड, नटबोल्ट, चेन, टायर, बेअरिंग, दातेरी चक्र आणि इंजिन यांचा वापर केला. यंत्राच्या निर्मितीसाठी दोन लाखांहून अधिक खर्च आला.

हे यंत्र काम करत असताना जिल्ह्यातील विविध साखर कारखान्यांचे अध्यक्ष, संचालक मंडळ, अधिकारी, तसेच परिसरातील प्रगतिशील शेतकऱ्यांनीही पाहणी केली. हे यंत्र मजूर समस्येवर चांगलाच उतारा ठरले आहे.

यंत्राची वैशिष्ट्ये◼️ यंत्रामुळे ट्रेलरमध्ये ऊस भरण्यासाठी बैलगाडी, फळ्या लागत नाहीत.◼️ पाच मजुरांद्वारे अवघ्या ४५ मिनिटांत एक ट्रेलर भरला जातो.◼️ यंत्राद्वारे एका दिवसात आठ ट्रेलर भरता येतात.◼️ शेताच्या लांबीनुसार या यंत्राची लांबी कमी-अधिक करता येते.◼️ ट्रॅक्टरद्वारे यंत्राची वाहतूक शक्य.◼️ ५० टन ऊस भरण्यासाठी मजुरांचा खर्च अर्ध्यावर येतो.◼️ ट्रेलर रस्त्यावर ठेवूनच भरता येतो. परिणामी शेतातील तुडवणी कमी.◼️ पलटी होण्याचा धोकाही कमी.

ऊस भरण्यासाठीचे यंत्र एकूण ७५ फूट लांबीचे आहे. फोल्डिंग केल्यानंतर त्याची लांबी २५ फूट होते. हे यंत्र ट्रॅक्टर ट्रेलरला जोडले जाते. पट्टयावर उसाच्या मोळ्या टाकल्या जातात. इंजिनद्वारे पट्टे फिरत असल्याने उसाच्या मोळ्या थेट ट्रेलरमध्ये पडतात. हे यंत्र वाहनात ऊस भरण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. - सनी काळभोर

अधिक वाचा: एफआरपी निश्चित करण्यासाठी केंद्र शासनाने दिला 'हा' निणर्य; आता असा ठरणार उसाचा दर?

टॅग्स :ऊससाखर कारखानेशेतकरीशेतीशेती क्षेत्रकाढणी पश्चात तंत्रज्ञानकाढणीमहाराष्ट्र