Join us

नारळापासून विविध पदार्थ बनविण्यासाठी कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलंय हे नवीन यंत्र; वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 12:02 IST

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभागांतर्गत नारळ वाळवणी यंत्र विकसित केले आहे. या यंत्राद्वारे किलो नारळ वाळवणे तसेच नारळाच्या चिप्ससुद्धा करणे सोपे झाले आहे.

रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभागांतर्गत नारळ वाळवणी यंत्र विकसित केले आहे. या यंत्राद्वारे किलो नारळ वाळवणे तसेच नारळाच्या चिप्ससुद्धा करणे सोपे झाले आहे.

नारळाच्या सुरुवातीच्या ६० टक्के आर्द्रतेपासून ६ टक्के आर्द्रतेपर्यंत वाळवणे शक्य होते. यासाठी ऋतुमानानुसार ३० ते ३५ तासांचा कालावधी लागतो.

या वाळवणी यंत्रासाठी नारळाचे सोढणं इंधन म्हणून वापरता येते. त्यामुळे हे वाळवणी यंत्र आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरु लागले आहे.

नारळाचे चिप्सनारळ फोडून खोबरे करंवटीपासून दूर करून घ्यावा. साल पिलरच्या मदतीने काढून ०.०५ टक्का पोटॅशियम मेटाबाय-सल्फाइट मिश्रित उकळणाऱ्या पाण्यात १५ मिनिटे उकळून घ्यावे. स्लायसरने खोबऱ्याचे चिप्स (काप) करा आणि साखर/मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवावे.

नारळाचे गोड कापनारळाचे गोड काप बनविण्यासाठी साखर व पाणी १:१ या प्रमाणात घेऊन साखर पाण्यामध्ये विरघळेपर्यंत मिश्रण गरम करा व त्या मिश्रणात व्हॅनिला फ्लेवरचे ४ ते ५ थेंब टाकून चिप्स ४५ मिनिटे बुडवून नंतर वाळवणी यंत्रात सुकवण्यासाठी ठेवावेत.

भाजणीसाठी तापमानकाप कुरकरीत होण्यासाठी ६०० ते ६५ अंश सेल्सिअस तापमानात ४ ते ५ तास लागतात. भाजणीकरिता तापमान २० अंश सेल्सिअसपर्यंत वाढवावे आणि कापांना हलका सोनेरी रंग येईपर्यंत वाळवावे. वाळवणी यंत्रातून काढल्यानंतर थंड होऊ द्यावे.

सुके खोबरे तयार करणेवाळवणी यंत्र वापरून गरम हवेच्या उष्णतेने नारळ वाळवले जातात. ओल्या खोबऱ्यातील पाण्याचा अंश ५५ टक्के ते ६० टक्के पर्यंत आणावा. वाळवणी यंत्रामध्ये या पूर्ण प्रक्रियेला ३० ते ३३ तास लागतात. सुके खोबरे बनवण्यासाठी तयार नारळ वापरावा.

जैविक इंधनाचा वापरजैविक इंधनाचा वापर केल्यामुळे इतर इंधनाचा खर्चही कमी होतो. एक किलो ओल्या खोबऱ्यापासून ६०० ग्रॅम सुके खोबरे मिळू शकते. शिवाय  खोबऱ्याला धुराचा वास येत नाही.

विद्यापीठाने विकसित केलेले वाळवणी यंत्र फायदेशीर आहे. इंधनाचे ज्वलन, खोबरे वाळवणे दोन गोष्टी वेगवेगळ्या ठिकाणी होतात. त्यामुळे धुराचा वास येत नाही. - सुरेश शेट्ये, शेतकरी

अधिक वाचा: कोल्ड प्रेस तेल व रिफाइन्ड तेल यातील फरक काय? समजून घेऊया सोप्या भाषेत

टॅग्स :काढणी पश्चात तंत्रज्ञानफळेफलोत्पादनशेतकरीकोकणविद्यापीठअन्न