कोकणात उत्पादित होणाऱ्या विविध फळांपासून टिकाऊ पदार्थ बनविण्याच्या पद्धती डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाने विकसित केल्या आहेत.
या पध्दतीचा अवलंब केल्यास टिकाऊ पदार्थ तयार करून व्यवसायाची संधी आहे. घरगुती व्यवसायातून महिलांनासुध्दा अर्थार्जनही करता येते.
करवंद सिरप- पिकलेल्या करवंदापासून सिरप तयार करण्यासाठी सर्वप्रथम पूर्ण पिकलेली, ताजी, रसरशीत करवंद निवडून घ्यावीत.- ती पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावीत.- नंतर करवंदे न शिजवता चाळणीवर घालून त्यापासून रस काढावा.- एक किलो रसामध्ये २ किलो साखर टाकून एकूण विद्राव्य घटकांचे प्रमाण ६८.५ टक्के करावे.- सायट्रिक आम्ल टाकून निर्जंतूक केलेल्या बाटल्यात सिरप भरून बाटल्या थंड जागी ठेवाव्या.
कच्च्या करवंदाचे लोणचे- ताजी कच्ची करवंदे देठ काढून दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावीत.- सर्व प्रथम करवंदांना निम्मे मीठ व निम्मी हळद लावून ती स्टीलच्या पातेल्यात २ ते ३ तास ठेवावीत.- त्यामुळे करवंदातील पाणी बऱ्याच अंशी निचरून जाते.- निम्मे गोडेतेल घेऊन त्यात मेथी, हळद, हिंग, मोहरी वापरून फोडणी तयार करावी.- ही फोडणी अंगचे पाणी निथळलेल्या करवंदामध्ये मिसळावी.- लोणच्यात एक किलोस २५० किलो ग्रॅम या प्रमाणात सोडियम बेंझोएट मिसळून लोणचे बरणीत भरल्यानंतर शिल्लक राहिलेले आणि उकळून थंड केलेले गोडेतेल बरणीत ओतावे.- तेलाची पातळी लोणच्यावर राहील याची काळजी घ्यावी.- बरण्या झाकण लावून बंद कराव्यात व थंड किंवा कोरड्या जागी ठेवाव्यात.
अधिक वाचा: आंब्यापासून तयार करा ही दोन सोपी उत्पादने आणि सुरु करा स्वत:चा प्रक्रिया उद्योग