Join us
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय भागभांडवल घ्या, गाळप क्षमता वाढवा, सदर योजनेबाबत नवीन शासन निर्णय आला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 14:50 IST

Sakhar Karkhane Galap : याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Sugar Factory : "राज्यातील प्रतिदिन १२५० मे. टन गाळप क्षमता असलेल्या सहकारी साखर कारखान्यांची गाळप क्षमता प्रतिदिन २५०० मे. टन करण्यासाठी शासकीय भागभांडवल देण्याबाबत" या योजनेंतर्गत सहकारी साखर कारखान्यांना दिलेल्या शासकीय भागभांडवलाच्या खर्चाच्या व परतफेडीच्या (मुद्दल व व्याज जमा करण्यासाठी) लेखाशिर्षांना मान्यता देण्यात आली आहे.

याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यानुसार.... 

भागभांडवलाच्या खर्चाचे लेखाशिर्ष 

  • सहकारासाठी कर्ज
  • इतर सहकारी संस्थांना कर्ज
  • सहकारी साखर कारखाने (मिल्स)
  • इतर सहकारी साखर कारखान्यांना भागभांडवल (कार्यक्रम)

 

भागभांडवलाच्या जमेचे लेखाशीर्ष

सहकारासाठी कर्जेइतर सहकारी संस्थांना कर्जेसहकारी साखर कारखान्यांची गाळप क्षमता वाढीसाठी दिलेल्या शासकीय  भागभांडवलाची परतफेड 

भागभांडवलाच्या थकित रकमेवरील दंडनीय व्याजाच्या जमेचे लेखाशिर्ष -

  • व्याजाच्या जमा रकमा
  • राज्य/संघराज्य क्षेत्र विधानमंडळ असलेल्या शासनाच्या व्याजाच्या जमा रकमा
  • सहकारी संस्थांकडून व्याज
  • सहकारी संस्थांकडून व्याज
  • सहकारी साखर कारखान्यांची गाळप क्षमता वाढीसाठी दिलेल्या शासकीय भागभांडवलाच्या थकित रकमेवरील दंडनीय व्याज

 

वित्त विभागाने पत्रान्वये दिलेल्या सुचनांनुसार "राज्यातील प्रतिदिन १२५० मे. टन गाळप क्षमता असलेल्या सहकारी साखर कारखान्यांची गाळप क्षमता प्रतिदिन २५०० मे. टन करण्यासाठी शासकीय भागभांडवल देण्याबाबत" या योजनेकरीता सहकारी साखर कारखान्यांना दिलेल्या शासकीय भागभांडवलाच्या खर्चाच्या व परतफेडीच्या (मुद्दल व व्याज जमा करण्यासाठी) उपलब्ध करुन दिलेल्या लेखाशिर्षांना मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Government Share Capital for Sugar Factories: Increased Crushing Capacity Approved!

Web Summary : Government approves accounting heads for share capital scheme boosting sugar factory crushing capacity from 1250 to 2500 MT. The decision facilitates expenditure, repayment of principal, and interest collection, detailed in a government resolution available online.
टॅग्स :साखर कारखानेऊसशासन निर्णयमहाराष्ट्रकृषी योजना