Liquid Jaggery : काकवी (Liquid Jaggery) म्हणजे उसाचा रस उकळून, घट्ट करून तयार केलेला एक गोड, चिकट द्रव पदार्थ आहे, जो गुळाच्या निर्मिती प्रक्रियेतील मधला टप्पा असतो. ही काकवी तयार करण्याची प्रक्रिया कशी असते, गुळापेक्षा काकवीला कशी मागणी असते, ते पाहुयात....
दर्जेदार काकवी तयार करण्याची प्रक्रिया
पाकाची ही स्थिती ओळखण्यासाठी इलेक्ट्रॉनिक थर्मामीटरचा वापर करणे फायद्याचे ठरते. या काकवीच्या अवस्थेला काहील त्वरित खाली उतरावी आणि काकवीसाठी खास तयार केलेल्या स्टील, अल्युमिनिअम अथवा जी. आय पत्र्याच्या पिंपात ओतावी. अशा पिंपांना तळापासून थोड्या उंचीवर तोटी बसवलेली असावी.
काकवी गरम असताना त्यात काकवीच्या वजनाच्या प्रमाणात सायट्रिक आम्ल ४०० मिली ग्रॅम प्रति किलो टाकावे म्हणजे काकवी आकर्षक रंगाची होऊन तिच्यात साखरेचे खडे तयार होत नाहीत. काकवी खराब होऊ नये तसेच टिकाऊपणा वाढावा म्हणून त्यात पोटॅशिअम मेटाबायसल्फाइट १ ग्रॅम प्रति किलो किंवा बेन्झाईक आम्ल ५ ग्रॅम प्रति किलो टाकावे.
काकवी ८ ते १० दिवस पिंपात तशीच संथ राहू द्यावी म्हणजे तिच्यातील जाड कण, अविद्राव्य घटक पिंपाच्या तळाला बसतील. काकवीच्या पृष्ठभागावर तरंगणारे पदार्थ हलकेच शिब्याने काढून टाकावेत. त्यानंतर पिंपाच्या तळाशी थोड्या उंचीवर बसवलेल्या तोटीतून हळुवारपणे काकवी दुसऱ्या अल्युमिनियम अथवा स्टेनलेस स्टिलच्या भांड्यात गाळून घ्यावी.
त्यानंतर काकवीस हलकी उकळी आणावी. नंतर हे भांडे शेगडीवरून खाली उतरावे. उकळत्या पाण्यात साधारणपणे १५ ते २० मिनिटे बुडवून बाटल्या निर्जंतुक कराव्यात. २००, २५०, ५०० मिली क्षमतेच्या बाटल्या तोंडाकडे १ सें. मी. जागा मोकळी सोडून त्यामध्ये गरम काकवी भरावी.
- प्रा. एस. एस. प्रचंड, डॉ. डी. आर. निकम, डॉ. व्ही एन. गमे,
सहाय्यक प्राध्यापक, मराठा विद्या प्रसारक समाजाचे कर्मयोगी हुलाजी सिताराम पाटील, कृषी महाविद्यालय, नाशिक
Read More : ऊसापासूनची गूळ निर्मिती, आपल्या घरी येणारा गूळ नेमका कसा तयार करतात, वाचा संपूर्ण प्रक्रिया
