Ambyache Lonche : आंब्याचा सीजन (Mango Season) सुरु आहे. जो तो केवळ आंबे खाण्याच्या मूडमध्ये आहे. दुसरीकडे मात्र आंब्यांचा लोणच्याची क्रेझ देखील विसरून चालणार नाही. येणाऱ्या पावसाळ्यात जेवणासोबत तोंडाला चव आणणार रसायन म्हणजे आंब्याचे लोणचं (Mango Pickle). त्यामुळे या दिवसांत घरोघरी आंब्याचे लोणचे बनतं असत. आता लोणचं कसं बनवायचं (How To Make Mango Pickle), हे समजून घेऊया.
तोंडाला चव येण्यासाठी आंब्याचे लोणचे खाणे फायदेशीर ठरते. खास करून आजारी व्यक्तीला आजारपणात जिभेला चव यावी, म्हणून लोणचे खाण्यासाठी दिले जाते. आंब्याचे लोणचे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. लोणच्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अॅन्टिऑक्सॅिट्स भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
चवीला आंबट व गोड असणाऱ्या लोणच्याला मोठी पसंती आहे. विशेष म्हणजे, बाजारात लोणचाच्या आंब्याला मागणी वाढली असून अनेक गृहिणी घरी लोणचे तयार करण्यात व्यस्त दिसून येत आहेत. काही महिलांनी घरगुती लोणचे तयार करून तो पॉकीटमध्ये बंद करून विक्रीचा गृहउद्योगही सुरू केला आहे.
पदार्थ बनविण्यासाठी लागणारे साहित्य
- ३ किलो आंबे
- दीड किलो तेल
- तिखट २०० ग्रॅम
- मीठ २५० ग्रॅम
- हळद २ चमचे
- मोहरी डाळ ५०० ग्रॅम
- कलमी ५ ते ६
- मेथी दाणे ३ चमचे
- सोप ३ चमचे
- हिंग १ चमचा
- गूळ २५ ग्रॅम.
पदार्थ बनविण्याची कृती
- सर्वप्रथम आंबे स्वच्छ धुऊन-पुसून घ्यावेत, फोडी कापून घ्याव्यात.
- त्यानंतर आंब्याच्या फोडी हळद व मीठ लावून रात्रभर सुकवून घ्याव्यात.
- एका भांड्यामध्ये कलमी, मेथीदाणे, सोप मंद आचेवर भाजून घ्यावे.
- मोहरीची डाळही मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर, बारीक करून घ्यावी.
- त्यानंतर एका भांड्यात तेल गरम करून घ्यावे.
- तेल थोडे थंड झाल्यावर त्यामध्ये हिंग, बारीक केलेला मसाला, चवीपुरता गूळ, तिखट, हळद आणि मीठ हे सर्व जिन्नस मिसळून घ्यावेत.
- मसाला थंड झाल्यानंतर आंब्याच्या फोडी मिक्स करून फिरवून घ्याव्यात.
- त्यानंतर बरणीमध्ये भरून घ्यावे. १५ दिवसानंतर हे लोणचे चांगले मुरते.
- त्यानंतर तेल सोडावे. त्यानंतर लज्जतदार व चवदार लोणचे तयार होते.