Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >कृषी प्रक्रिया > आपण उपवासाला भगर करून खाल्ला जाणारा शाबु नक्की कसा तयार होतो? जाणून घ्या सविस्तर

आपण उपवासाला भगर करून खाल्ला जाणारा शाबु नक्की कसा तयार होतो? जाणून घ्या सविस्तर

How exactly is the shabu, which we eat to break our fast, prepared? Find out in detail | आपण उपवासाला भगर करून खाल्ला जाणारा शाबु नक्की कसा तयार होतो? जाणून घ्या सविस्तर

आपण उपवासाला भगर करून खाल्ला जाणारा शाबु नक्की कसा तयार होतो? जाणून घ्या सविस्तर

आपण ज्वारी बाजरीची कणसं, तांदळाच्या ओंब्या बघतो. बागेत, शेतात आपण खातो त्या भाज्या बघतो. पण साबुदाण्याचे शेत, झाड, कणीस, फळ कधी पाहिले आहे का? हा साबुदाणा येतो कुठून?

आपण ज्वारी बाजरीची कणसं, तांदळाच्या ओंब्या बघतो. बागेत, शेतात आपण खातो त्या भाज्या बघतो. पण साबुदाण्याचे शेत, झाड, कणीस, फळ कधी पाहिले आहे का? हा साबुदाणा येतो कुठून?

शेअर :

Join us
Join usNext

आपण ज्वारी बाजरीची कणसं, तांदळाच्या ओंब्या बघतो. बागेत, शेतात आपण खातो त्या भाज्या बघतो. पण साबुदाण्याचे शेत, झाड, कणीस, फळ कधी पाहिले आहे का? हा साबुदाणा येतो कुठून?

साबुदाण्याला इंग्रजीमध्ये सँगो (sago) म्हणतात. साबुदाणा हे धान्य, कडधान्य किंवा बिया नाही. ही एक कंद वर्गीय वनस्पती आहे. या वनस्पतीची आता व्यावसायिक शेती केली जाते.

आपल्याकडे रताळी दिसतात त्या सारख्या दिसणाऱ्या टॅपिओका या कंदांपासून साबुदाणा तयार करतात. मूळ आफ्रिकेतील असणारं कसावा (Cassava) नावाच्या झाडाची मुळे म्हणजे टॅपिओका.

कसा तयार होतो शाबु?
◼️ टॅपिओका पिओका (कसावा) च्या झाडाची मुळं, कंद जमिनीतून काढली जातात.
◼️ ही मुळं, कंद स्वच्छ धुतली जातात आणि त्यांची साल काढली जाते.  
◼️ सोललेली मुळं, कंद ग्राइंडिंग मशीनमध्ये बारीक केली जातात, ज्यातून एक पेस्ट तयार होते.
◼️ त्या पेस्टमधून त्यांचा मोठ्या यंत्रामध्ये लगदा करतात. हा लगदा म्हणजे स्टार्च असतो.
◼️ कुरड्या करताना गव्हाचा चिक पाण्यात ठेवतात तसा हा स्टार्च स्वच्छ होण्यासाठी पाण्यामध्ये ठेवतात.
◼️ नंतर पाणी काढून तो नैसर्गिक किंवा कृत्रिम पद्धतीने वाळवला जातो. मग त्या पांढऱ्या शुभ्र पीठाच्या वड्या तयार होतात.
◼️ त्यांना एका विशिष्ट यंत्रात टाकून त्याचे गोळे केले जातात. हे गोळे म्हणजे साबुदाणा.
◼️ शाबु टिकण्यासाठी तो कडक वाळवून बाजारात विकण्यासाठी पाठवतात.
◼️ साबुदाण्याची खिचडी, थालीपीठ, वडे किंवा खीर करतात ते सगळ्यांना मनापासून आवडते. मात्र साबुदाणा पचायला खूप वेळ लागतो.

अधिक वाचा: गोदाम व तेलबिया प्रक्रिया युनिटसाठी आता एकाच योजनेतून मिळणार अनुदान; वाचा सविस्तर

Web Title: How exactly is the shabu, which we eat to break our fast, prepared? Find out in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.