Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >कृषी प्रक्रिया > Devgad Hapus देवगड हापूसचा आमरस जगात चवीमध्ये भारी

Devgad Hapus देवगड हापूसचा आमरस जगात चवीमध्ये भारी

Devgad Hapus The amras of Devgad Hapus is huge in taste in the world | Devgad Hapus देवगड हापूसचा आमरस जगात चवीमध्ये भारी

Devgad Hapus देवगड हापूसचा आमरस जगात चवीमध्ये भारी

टेस्ट अॅट लास्टने जागतिक पातळीवर लोकप्रिय असलेल्या आंब्यांच्या पदार्थांची चव, गुणवत्ता, प्रक्रिया व लोकप्रियता या निष्कर्षांवर जगातील दहा पदार्थांची निवड केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील देवगड हापूसच्या आमरसाने प्रथम क्रमांक मिळवला आहे.

टेस्ट अॅट लास्टने जागतिक पातळीवर लोकप्रिय असलेल्या आंब्यांच्या पदार्थांची चव, गुणवत्ता, प्रक्रिया व लोकप्रियता या निष्कर्षांवर जगातील दहा पदार्थांची निवड केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील देवगड हापूसच्या आमरसाने प्रथम क्रमांक मिळवला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

अयोध्याप्रसाद गावकर
देवगड : जगप्रसिद्ध देवगड हापूसचा आमरस आंब्याच्या पदार्थांमध्ये सर्वश्रेष्ठ ठरला. जगात मराठमोळ्या आमरसाने चवीमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. 'टेस्ट अॅट लास्ट' या नामवंत ऑनलाइन फूड गाईडने केलेल्या अभ्यासात आंब्याची भारतातील लोकप्रियता समोर आली आहे.

टेस्ट अॅट लास्टने जागतिक पातळीवर लोकप्रिय असलेल्या आंब्यांच्या पदार्थांची चव, गुणवत्ता, प्रक्रिया व लोकप्रियता या निष्कर्षांवर जगातील दहा पदार्थांची निवड केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील देवगड हापूसच्या आमरसाने प्रथम क्रमांक मिळवला आहे.

देवगड हापूस आंब्याला जगातून मागणी आहे. अनेक खवय्यांच्या मनावर अधिराज्य गाजवून देवगड हापूसने आपले नाव जगावर कोरले आहे. आता याच आंब्याच्या रसापासून बनलेल्या आमरसानेही चवीमध्ये जगात पहिला क्रमांक मिळवला आहे.

देवगड हापूसपासून आमरस, आंबा पोळी, आंबा बर्फीं, आंबा मोदक, आंबा चटणी असे पदार्थ तयार केले जातात. यामध्ये आमरसाबरोबरच मँगो चटणीनेदेखील मँगो पदार्थांमध्ये जगात चवीमध्ये पाचवा क्रमांक मिळवला आहे.

महाराष्ट्रातील आंब्यापासून बनविण्यात आलेला आमरस हा जगातील चवीमध्ये पहिल्या क्रमांकावर आला असून, विशेष म्हणजे हा आंबा कोकणामध्येच जास्त प्रमाणात आहे. विशेष करून देवगडमधून सुमारे दरवर्षी १० ते १५ हजार टन आंबा हा आमरसासाठी जात असतो.

यावर्षी देवगड हापूसचा मुख्य हंगाम विशेष करून चार महिने चालला होता. फेब्रुवारी ते मे महिन्यापर्यंत सलग आंबा तोडणी या चार महिन्यांमध्ये केली गेली. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला आंबा कॅनिंग सेंटर तालुक्यामध्ये उभारण्यात आले होते. या कॅनिंग सेंटरच्या माध्यमातून आंबा गोळा करून विविध कंपन्या आमरसासाठी हा कॅनिंगचा आंबा घेत असतात.

यावर्षी दीर्घकाळ चाललेल्या कॅनिंगच्या व्यवसायामुळे सुमारे १५ ते १६ हजार टन आंबा आमरसासाठी गेला असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या हा आमरस देवगड बाजारपेठेमध्ये देखील उपलब्ध असून, अर्धा लिटर आमरसाची किंमत सुमारे २०० रुपये आहे. या आमरसालाही राज्यभरातून हापूस आंब्यासारखीच मागणी असते.

पॅकबंद बाटलीमध्ये हा आमरस वर्षभर टिकू शकतो. यामुळे आंबा विक्रीप्रमाणे आंब्याचा आमरस बनवून बहुतांश बागायतदार आमरसाची विक्री करत असतात. तालुक्यामध्ये आमरस बनविणाऱ्या अनेक कंपन्या असून, घरगुती आमरस बनविणारेदेखील अनेक व्यापारी आहेत. आमरस बनविणाऱ्या कंपन्या नाशिक, रत्नागिरी, कोल्हापूर येथे आहेत.

आंब्याच्या टॉप दहा डिश
'टेस्ट अॅट लास्ट' या नामावंत फुड गाईडने केलेल्या अभ्यासात आंब्याच्या टॉप दहा डिश आमरस (महाराष्ट्र, भारत), मँगो स्टिकी राईस (थायलंड), सोर्बेत (फिलिपाईन्स), रुजाक (जावा, इंडोनेशिया), मँगो चटणी (भारत), मँगो पोमेलो सागो (हाँगकाँग), मांगुओ बुडिंग (ग्वांगडाँग, चीन), रुजाक सिंगुर (सुराबाया, इंडोनेशिया), बाओबिंग (ग्वांगडाँग, चीन), माम्वांग नाम्या वान (थायलंड).

अधिक वाचा: Mango Varieties: आंबा लागवड करताय? कोणत्या जातीची निवड कराल

Web Title: Devgad Hapus The amras of Devgad Hapus is huge in taste in the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.