पोलिस, सरकारची वाट पाहू नका, घुसखोर दिसताच पाय तोडा, पळवा; हिमंता बिश्वा सरमांचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 10:16 AM2024-05-16T10:16:48+5:302024-05-16T10:17:20+5:30

सरकार करेल, पोलिस करतील असे चालणार नाही. हे घुसखोर म्हणजे कॅन्सर आहेत. हे सगळेच बदलून टाकतात. यामुळे लोकांनी त्यांना पाहिले की त्यांचे पाय तोडून टाका, पोलिसांनी पाहिले तर पोलिसांनी तोडावेत, असे वक्तव्य सरमा यांनी केले आहे.

Don't wait for the police, the government, break the leg and run away as soon as you see the intruder; Statement by Himanta Bishwa Sarma in Jharkhand | पोलिस, सरकारची वाट पाहू नका, घुसखोर दिसताच पाय तोडा, पळवा; हिमंता बिश्वा सरमांचे वक्तव्य

पोलिस, सरकारची वाट पाहू नका, घुसखोर दिसताच पाय तोडा, पळवा; हिमंता बिश्वा सरमांचे वक्तव्य

भाजपाला ४०० जागा का हव्यात याचे कारण सांगणारे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिश्वा सरमांनी घुसखोर दिसले की त्यांचे पाय तोडण्याचे आदेश लोकांना देत वादग्रस्त विधान केले आहे. जर झारखंडला वाचवायचे असेल तर घुसखोर दिसताच त्यांचे पाय तोडा आणि पळवून लावा असे ते म्हणाले आहेत.

सरकार करेल, पोलिस करतील असे चालणार नाही. हे घुसखोर म्हणजे कॅन्सर आहेत. हे सगळेच बदलून टाकतात. यामुळे लोकांनी त्यांना पाहिले की त्यांचे पाय तोडून टाका, पोलिसांनी पाहिले तर पोलिसांनी तोडावेत. झारखंडमध्ये बांग्लादेशी घुसखोर आहेत, त्यांना काँग्रेस-झामुमो सरकारचा पाठिंबा आहे. ३० वर्षांपूर्वी आसाममध्येही घुसखोर येण्यास सुरुवात झाली होती. तेव्हाच्या सरकारने घुसखोरी रोखण्यासाठी पाऊले उचलली नाहीत. यामुळे आता ही समस्या एवढी भीषण बनली आहे की ११ जिल्ह्यांची लोकसंख्याच बदलून गेली आहे. आता आम्ही तिथे अल्पसंख्यांक बनलो आहोत. जर इथे त्यांना रोखले नाही तर पूर्ण झारखंडची हीच परिस्थिती होणार आहे, असा इशारा सरमा यांनी दिला. 

झारखंडच्या गिरीडीह आणि रामगढ जिल्ह्यातील प्रचारसभेला ते संबोधित करत होते. राहुल गांधी कधीही भारताचे पंतप्रधान बनू शकणार नाहीत. जर त्यांना पीएम व्हायचेच असेल तर त्यांनी पाकिस्तानला जाऊन त्यांची इच्छा पूर्ण करावी. आम्ही त्यांना पासपोर्ट, व्हिसा बनविण्यास मदत करू. देशाचे पंतप्रधान पद मोदींसाठीच बुक आहे, असे सरमा म्हणाले. 

यावेळी ४०० जागा आल्या तर पीओके भारतात येईल, युसीसी लागू होईल. आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात धर्माच्या नावे मुस्लिमांना आरक्षण देण्याचे काँग्रेसकडून जे प्रयत्न सुरु आहेत ते संपविता येतील असे सरमा म्हणाले. 

Web Title: Don't wait for the police, the government, break the leg and run away as soon as you see the intruder; Statement by Himanta Bishwa Sarma in Jharkhand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.