Photos: वासुदेव आला रे वासुदेव आला; मातोश्रीवर सेवेकरी उद्धव ठाकरेंच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 05:31 PM2023-10-10T17:31:54+5:302023-10-10T18:36:08+5:30

शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिवसेनेत दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटातील वाद आता सर्वपरिचीत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत येण्याची स्पर्धाच लागल्याचं दिसून येते.

शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिवसेनेत दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटातील वाद आता सर्वपरिचीत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत येण्याची स्पर्धाच लागल्याचं दिसून येते.

महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील अनेकजण मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेत त्यांना आपला पाठिंबा दर्शवत आहेत. त्यात, अनेक स्थानिक पदाधिकारी व शिवसैनिक असतात.

महाराष्ट्राची परंपरा जपणाऱ्या, लोककलेशी नाळ जोडलेल्या जोशी, कुडमुडे, गोंधळी, वासुदेव, चित्रकथी, मेढंगी, बागडी, सरोदे समाजातील सेवेकर व लोककलाकारांनी आज उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली.

देवदेवतांची सेवा करून, गावोगावी भिक्षुकीसाठी फिरणाऱ्या ह्या सेवेकरी समाजामुळेच महाराष्ट्राची संस्कृती आजही टिकून आहे, असे उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटले.

गावोगावी फिरत असताना त्यांच्यासमोर येणाऱ्या समस्या ऐकून घेत, शिवसेना नेहमी त्यांच्यासोबत आहे, अशी ग्वाही उद्धव ठाकरेंनी लोककलावंतांना दिली. तसेच ‘सर्व सेवेकरी भेटले म्हणजे देवाचा कृपाशीर्वाद मिळाला’ अशी भावनाही व्यक्त केली.

दरम्यान, परांडा विधानसभा मतदार संघ, धाराशिव येथील सौ. जिनत सय्यद ह्यांच्यासह विविध गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनीही उद्धव ठाकरेंची भेट घेतली.

मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या प्रमुख उपस्थितीत शिवबंधन बांधून शिवसेना पक्षात प्रवेश केला. महाराष्ट्राच्या तळागाळातून शिवसेनेवर प्रेम करणारी ही जनता असल्याचं उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटलं.

दरम्यान, सध्या शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला असून दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कवर कोणाची सभा होणार, यावरुन ही लढाई सुरू होती. मात्र, शिवाजी पार्कवर ठाकरेंचीच सभा होणार हे निश्चित झालं आहे.

दुसरीकडे शिवसेना नाव आणि चिन्हाची लढाई सर्वोच्च न्यायालयात पोहोचली आहे. न्यायालायने याप्रकरणी सुनावणीला पुढील तारीख दिली आहे.