मध्य रेल्वेनं घेतलं मॉक ड्रिल, अनुचित प्रकार हाणून पाडण्यासाठी प्रशासन सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 08:06 PM2019-05-10T20:06:43+5:302019-05-10T20:13:56+5:30

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागानं अपघात झाल्यास आपत्कालीन यंत्रणा किती वेळात घटनास्थळी पोहोचू शकते, याचा आढावा घेण्यासाठी आज मॉक ड्रिल घेण्यात आला.(सर्व छायाचित्र- सुशील कदम)

दादर सेंट्रल रेल्वेचे 7 व 8 नंबरवर हे मॉक ड्रील घेण्यात आलं आहे. यावेळी अ‍ँब्युलन्समधून जखमी प्रवाशाला घेऊन जात असल्याचं प्रात्यक्षिकही दाखवण्यात आलं.

यादरम्यान ठेवण्यात आलेले स्फोटक श्वान पथकाने शोधून काढले. त्यानंतर बॉम्ब डिस्पोजल टीमने स्फोटक निकामी करीत मॉक ड्रील यशस्वी केली.

दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभागानंही आपण किती सज्ज आहोत हे दाखवलं आहे.

एनडीआरएफच्या टीमसह आरपीएफ आणि जीआरपी यांनी संयुक्तरीत्या हे मॉकड्रील केले आहे.

प्रत्येक अनुचित प्रकाराला हाणून पाडण्यासाठी पूर्णत: सज्ज असल्याचंही रेल्वे प्रशासनानं दाखवून दिलं आहे.

एनडीआरएफच्या टीमसह आरपीएफ आणि जीआरपी यांनी संयुक्तरीत्या हे मॉकड्रील केले आहे.