Ganesh Visarjan: वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी गणरायाला दिला भक्तिमय वातावरणात निरोप  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 09:33 PM2021-09-19T21:33:40+5:302021-09-19T21:45:57+5:30

Ganesh Visarjan News: मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानच्या गणरायाचे या परिसरात उभारण्यात आलेल्या कृत्रिम हौदामध्ये आज सायंकाळी श्री गणेशाचे विधिवत विसर्जन करण्यात आले. (सर्व छायाचित्रे - दत्ता खेडेकर)

मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानच्या गणरायाचे या परिसरात उभारण्यात आलेल्या कृत्रिम हौदामध्ये आज सायंकाळी श्री गणेशाचे विधिवत विसर्जन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , त्यांच्या पत्नी श्रीमती रश्मी ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, तसेच परिवारातील सदस्य उपस्थित होते.

अनंत चतुर्दशी दिवशी गणरायाला निरोप देताना राज्यास सुख, समृद्धी आणि आरोग्य नांदावे, यासाठी गणरायाकडे प्रार्थना करताना मुख्यमंत्री

बाप्पांना निरोप देण्यापूर्वी वर्षा निवासस्थानी भक्तिभावाने आरती करण्यात आली.

बाप्पांना शिदोरी देऊन आशीर्वाद घेताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे

आदित्य ठाकरे बाप्पांची मंगलमूर्ती विसर्जनस्थळी नेताना

बाप्पांचे विसर्जन करण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा बाप्पांची आरती केली

बाप्पांचे विसर्जन करताना आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.

पुढच्या वर्षी लवकर या अशी प्रार्थना करत मुख्यमंत्र्यांनी गणपती बाप्पांना निरोप दिला.