मुख्यमंत्र्यांनी पियूष गोयल आणि निर्मला सीतारमण यांच्यासोबत केली एल्फिन्स्टन स्थानकाची पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2017 02:30 PM2017-10-31T14:30:28+5:302017-10-31T14:34:40+5:30

एलफिन्स्टन स्थानकावरील फूटओव्हर ब्रिज भारतीय सैन्याकडून बांधला जाणार आहे. एल्फिन्स्टन, करीरोड, आंबिबलीचे पूल मिलिटरी बांधणार आहे.

मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज एल्फिन्स्टन स्थानकाची पाहणी केली. यावेळी ही घोषणा करण्यात आली.

5 नोव्हेंबरपासून भारतीय सैन्य फूटओव्हर ब्रिजच्या बांधकामाला सुरुवात करणार आहे. 31 जानेवारीपर्यंत पुलाचं बांधकाम पुर्ण करण्यात येणार आहे.

भारतीय सैन्यातील इंजिनीअरिंग विंग आपत्कालीन परिस्थितीत अशाप्रकारचे ब्रीज बांधते. कमीत कमी वेळात मिलिटरीकडून हा ब्रिज बांधला जाईल.

यापूर्वी राष्ट्रकुल स्पर्धेवेळी दिल्लीत पूल कोसळल्यानंतर मिलिटरीने तो लवकरात लवकर बांधून दिला होता.