लग्नातला सफारी घालून विलासराव पहिल्यांदा आमदार निवासात गेले अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 09:08 AM2021-05-26T09:08:18+5:302021-05-26T09:22:10+5:30

ही नकली आमदारकी मला परवडणारी नाही”. त्यावेळी सगळेच हसायला लागले. विलासरावांचा हा दिलदार आणि मिश्कीलपणा त्यांच्या भाषणातूनही अनेकांनी अनुभवलाय.

महाराष्ट्राच्या राजकारणात गावापासून दिल्लीपर्यंत आपली आणि सुसंस्कृत महाराष्ट्राची ओळख ज्यांनी देशाला करुन दिली, त्या दिवंगत विलासराव देशमुख यांची आज जयंती.

राजबिंडा पुढारी, ध्येयधोरणी नेता आणि जनसामान्यांचा लोकनेता अशी ओळख असलेल्या विलासरावांनी बाभळूगावच्या सरपंचपदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली.

सरपंच ते केंद्रीयमंत्री व्हाया मुख्यमंत्री हा त्यांचा प्रवास सोप्पा नव्हता. पण मै चलता गया और कारवा बनता गया... अशीच त्यांच्या नेतृत्वाची ओळख राहिली आहे. लोकांनी त्यांना चालत-बोलत स्विकारलं.

माणसांत रमणारा नेता म्हणून विलासरावांची ओळख होती, त्यामुळेच त्यांच्या आठवणी अनेकजण जागवतात. तेच किस्से सोशल मीडियावरही व्हायरल होत असतात. ते पहिल्यांदा आमदार झाल्यानंतरचा असाच एक किस्सा आहे.

बाभूळगावचे सरपंचपद भूषवल्यानंतर ते उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे सदस्य तसेच लातूर पंचायत समितीचे उप-सभापती होते. १९७९ मध्ये उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बॅंक तथा महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेचे संचालकपदही त्यांनी भूषवले होते.

१९८० पासून ते खऱ्या अर्थाने राज्याच्या राजकारणात आले. सन १९८० साली ते पहिल्यांदा आमदार झाले. १९८० साली विलासराव पहिल्यांदा विधानसभेत निवडून आले.

तेव्हा, मित्रांना सोबत घेऊन ते आमदार निवासात गेले, त्यावेळी लग्नातील सफारी त्यांच्या अंगावर होता तर त्यांच्या मित्राच्या अंगावर खादीचे कपडे.

लग्नातील सफारी अंगावर असलेल्या विलासरावांना प्रवेशासाठी कर्मचाऱ्यांनी अडवले व विष्णू भूतडा यांच्या अंगावरील खादी कपडे बघून त्यांनाच ते आमदार समजू लागले.

लग्नातील सफारी अंगावर असलेल्या विलासरावांना प्रवेशासाठी कर्मचाऱ्यांनी अडवले व विष्णू भूतडा यांच्या अंगावरील खादी कपडे बघून त्यांनाच ते आमदार समजू लागले.

दुसऱ्या दिवशी, सकाळी चहा कॉफी झाली. रुमबॉयने विष्णू भूतडांनाच सॅल्युट ठोकला व बिल समोर केले. तेव्हा विष्णू भुतडा म्हणाले, “विलासराव आत्ता खादीचे कपडे शिवा.

ही नकली आमदारकी मला परवडणारी नाही”. त्यावेळी सगळेच हसायला लागले. विलासरावांचा हा दिलदार आणि मिश्कीलपणा त्यांच्या भाषणातूनही अनेकांनी अनुभवलाय.

म्हणूनच विलासराव यांच्या अकाली निधनानंतर लातूरसह महाराष्ट्राच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. एका लोकनेत्याला महाराष्ट्राने गमावले होते.