राष्ट्रवादी आमदार अपात्र निकाल कधी येणार? पक्षाचे चिन्ह अजित पवारांकडे गेल्यानंतर राहुल नार्वेकरांची मोठी माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 03:32 PM2024-02-07T15:32:16+5:302024-02-07T15:41:27+5:30

गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावरुन जोरदार चर्चा सुरू होती. काल रात्री यावरुन निवडणूक आयोगाने निकाल दिला असून खासदार शरद पवारांना धक्का दिला आहे.

When will the disqualification result of NCP MLA come? Big information about Rahul Narvekar after the party symbol went to Ajit Pawar | राष्ट्रवादी आमदार अपात्र निकाल कधी येणार? पक्षाचे चिन्ह अजित पवारांकडे गेल्यानंतर राहुल नार्वेकरांची मोठी माहिती

राष्ट्रवादी आमदार अपात्र निकाल कधी येणार? पक्षाचे चिन्ह अजित पवारांकडे गेल्यानंतर राहुल नार्वेकरांची मोठी माहिती

NCP ( Marathi News ) :मुंबई-  गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावरुन जोरदार चर्चा सुरू होती. काल रात्री यावरुन निवडणूक आयोगाने निकाल दिला असून खासदार शरद पवारांना धक्का दिला आहे. राष्ट्रवादी हे नाव आणि चिन्ह अजित पवार यांच्याकडेच राहिल असा निर्णय आयोगाने दिला आहे. तर आता आमदार अपात्रतेचा निकालही काही दिवसातच येणार आहे. याबाबत आता एक मोठी माहिती समोर आली आहे. 

" राष्ट्रवादी आमदार अपात्र निकाल हा मेरीटनुसारच दिला जाईल. निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाच याच्याशी कुठलाही संबंध जोडला जाणार नाही, याबाबत निवडणूक आयोगाकडून कोणतेही कागदपत्र मागवलेली नाहीत, त्यामुळे निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाचा यात काहीही संबंध नाही, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली. तसेच राष्ट्रवादी आमदार अपात्र निकाल १४ फेब्रुवारी येऊ शकतो अशी माहिती समोर आली आहे.  

'खरगेजींचे विशेष आभार, त्यांनी NDAला 400 जागांचा आशीर्वाद दिला', PM मोदींचा हल्लाबोल

दरम्यान, मंगळवारी रात्री निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत निकाल दिला.  लोकसभा निवडणूक तोंडावर असताना राष्ट्रवादीचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आल्याने हा शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. शरद पवार गटाला आता निवडणुकीला सामोरे जाताना नव्या पक्षासह आणि चिन्हासह निवडणुकीच्या मैदानात उतरावं लागणार आहे.

भाजप आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी होण्याच्या मुद्द्यावरून शरद पवार आणि अजित पवारांमध्ये मतभेद झाले. त्यानंतर अजित पवार यांनी शरद पवारांचा विरोध झुगारून महायुती सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राष्ट्रवादीत दोन गट पडले. महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे ४१ आमदार अजित पवारांसोबत गेले तर उर्वरित आमदारांनी शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. दोन्ही गटांनी पक्षावर दावा सांगितल्याने अखेर हे प्रकरण निवडणूक आयोगासमोर गेले. आयोगासमोर तब्बल १० वेळा झालेल्या सुनावणीनंतर आज निवडणूक आयोगाने अजित पवारांचा गट हाच मूळ राष्ट्रवादी पक्ष असल्याचं सांगत पक्षाचं चिन्हही त्यांना दिलं आहे.

Web Title: When will the disqualification result of NCP MLA come? Big information about Rahul Narvekar after the party symbol went to Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.