"जो नाही झाला काकांचा, तो काय होणार लोकांचा"; अजित पवारांना सूर्याजी पिसाळची उपमा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 01:01 PM2024-02-07T13:01:58+5:302024-02-07T13:45:04+5:30

लोकसभा निवडणूक तोंडावर असताना राष्ट्रवादीचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आल्याने हा शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

"What did not happen to the uncle, what will happen to the people"; Strong target on Ajit Pawar by Jitendra Awhad | "जो नाही झाला काकांचा, तो काय होणार लोकांचा"; अजित पवारांना सूर्याजी पिसाळची उपमा

"जो नाही झाला काकांचा, तो काय होणार लोकांचा"; अजित पवारांना सूर्याजी पिसाळची उपमा

मुंबई : राष्ट्रवादीतील फुटीनंतर पक्षाच्या चिन्हावर शरद पवार गटासह अजित पवारांच्या नेतृत्वाखालील गटानेही दावा केला होता. त्यामुळे हा वाद निवडणूक आयोगाकडे गेला आणि याप्रकरणी झालेल्या सुनावणीनंतर आता आयोगाने राष्ट्रवादीचं चिन्ह आणि नाव अजित पवार गटाला देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांनी अजित पवार आणि निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला. या निर्णयामागे अदृश्य शक्तची हात आहे, असे खासदार सुप्रिया सुळेंनी म्हटले. तर, आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही अजित पवारांवर जोरदार निशाणा साधला. 

लोकसभा निवडणूक तोंडावर असताना राष्ट्रवादीचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आल्याने हा शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. शरद पवार गटाला आता निवडणुकीला सामोरे जाताना नव्या पक्षासह आणि चिन्हासह निवडणुकीच्या मैदानात उतरावं लागणार आहे. यावरुन आता राजकीय वर्तुळातून आरोप -प्रत्यारोप सुरू आहेत. राष्टवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही प्रतिक्रीया दिली. माझ आजही अजित पवार यांना आवाहन आहे, नवीन पक्ष चिन्ह घेऊन मैदानात या असे चॅलेंजच आव्हाड यांनी दिले. तर, ''जो नाही झाला काकांचा, तो काय होणार लोकांचा'', असे म्हणत तिखट शब्दात टीक केली. त्यासोबत, अजित पवारांचे नाव न घेता सूर्याजी पिसाळची उपमाही आव्हाड यांनी अजित पवारांना दिल्याचं ट्विटरवरुन दिसून येत आहे. आव्हाड यांनी ट्विट करुन आपलं मत व्यक्त केलं आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निकालाला आम्ही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहोत. सर्वोच्च न्यायालय आम्हाला न्याय देईल याची आम्हाला खात्री आहे, असे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले. तर, दुसरीकडे आज राष्ट्रवादी शरद पवार गटाने अजित पवार यांच्याविरुद्ध निदर्शनेही सुरू केली आहेत.

काय म्हणाले आव्हाड

"ही गोष्ट आमच्यासाठी आश्चर्यकारक नाही. ज्यावेळी आमची राष्ट्रीय मान्यता काढली होती त्याच दिवशी  पुढे काहीतरी घडणार आहे माझ्या मनात शंका आली होती. आमच्या दृष्टीने जे हवे ते आम्ही दिले होते. चिन्ह आणि पक्ष तुमच्या ताब्यात देऊ या बोलीवरच हे ठरल आहे. ज्यांनी हा पक्ष सुरू केला त्याच्या हातातूनच हा पक्ष काढून घेतला आहे. शरद पवारांना या सगळ्याचे दु:ख होत आहे. हे पक्ष आणि चिन्ह काढून घेणार आम्हाला माहित होतं आमच चिन्हच शरद पवार आहेत. माझ आजही अजित पवार यांना आवाहन आहे नवीन पक्ष चिन्ह घेऊन मैदानात या असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

आमच्या वकिलांनी मांडलेली बाजू ऐकून घेऊन निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय आम्ही विनम्रपणे स्वीकारत आहोत!
- अजित पवार, 
अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

आयोगाने काय म्हटले?
पक्षांतर्गत निवडणुका झाल्या नाहीत. अजित पवारांचा गट हीच खरी राष्ट्रवादी कॉंग्रेस. ५ आमदार 
व एका खासदाराने दोन्ही बाजूंनी पत्र दिले.

Web Title: "What did not happen to the uncle, what will happen to the people"; Strong target on Ajit Pawar by Jitendra Awhad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.