कचरामुक्त धबधब्यांसाठी तरुणाईचे ‘स्वच्छमेव जयते’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 03:50 AM2018-07-23T03:50:01+5:302018-07-23T03:50:27+5:30

११ धबधब्यांतून केला ६.७ टन कचरा गोळा; शास्त्रीय पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट

'Swimmav Jayate' for the garbage-free waterfalls! | कचरामुक्त धबधब्यांसाठी तरुणाईचे ‘स्वच्छमेव जयते’!

कचरामुक्त धबधब्यांसाठी तरुणाईचे ‘स्वच्छमेव जयते’!

Next

- महेश चेमटे

मुंबई : पावसाळ्यात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी धबधब्यांवर अबालवृद्ध मोठ्या संख्येने हजेरी लावतात. याच पर्यटकांकडून होत असलेल्या कचºयाची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी तरुणाई सरसावली आहे. झेनिथ, पळसदरी, पांडवकडा यांसारख्या नामांकित ११ धबधब्यांच्या परिसरातून तब्बल ६ हजार ७०० किलो कचरा गोळ करण्यात आला. या उच्चशिक्षित तरुणांनी ‘स्वच्छमेव जयते’ची कास धरत, कचरा मुक्त धबधबा ही संकल्पना नागरिकांच्या पसंतीस उतरत आहे.
मुंबई विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर, माटुंगास्थित नामांकित इन्स्टिट्यूटमधून मानवी संसाधन विषयावर डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण करताना धर्मेश बारई या तरुणाने ‘इनव्हायर्नमेंट लाइफ’ संस्थेची स्थापना केली. आॅक्टोबर २०१६ साली नेरळ येथील आनंदवाडी धबधबा येथून ‘कचरामुक्त धबधबा’ या संकल्पेनची मुहूर्तमेढ रोवण्यात आल्याचे धर्मेशने ‘लोकमतला’ सांगितले.
मुंबईकरांच्या पसंतीचे असलेल्याभिवपुरी, पांडवकडा, पळसदरी, जुमापट्टी, चिंचोटी, कोंडेश्वर, आनंदवाडी येथीळ धबधबा परिसरातून एकूण ६ हजार ७२० किलो कचरा जमा करण्यात आला. या कचºयांमध्ये ८५ टक्के दारूच्या बाटल्या, तर १५ टक्के वेफर्स रॅपर, प्लॅस्टिक चमचे, प्लेट यांचा समावेश आहे.

एमटीडीसी कार्यवाही करणार तरी कधी?
राज्यातील नैसर्गिक धबधब्यांचा प्रादेशिक पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्याबाबत राज्य शासनाच्या ‘आपले सरकार’ संकेतस्थळावर २६ जुलै २०१७ रोजी सूचना करण्यात आली होती. १ आॅगस्ट २०१७ रोजी संकेतस्थळावरून सदर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला (एमटीडीसी) याबाबत सूचना करण्यात आल्याचे उत्तर देण्यात आले. मात्र, सद्यस्थितीतही कोणतीच कार्यवाही करण्यात आलेली नाही.

Web Title: 'Swimmav Jayate' for the garbage-free waterfalls!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.