कंबल बाबा्ंमुळे राम कदम अडचणीत; जादुई उपचारांनंतर अंनिसकडून कारवाईची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 03:08 PM2023-09-15T15:08:29+5:302023-09-15T15:10:06+5:30

राजस्थानामधील कंबल-बाबांना आमदार राम कदम यांनी मतदारसंघात आणले असून येथील विकलांग लोकांवर मोफत उपचार करण्यात येत आहेत.

Ram Kadam in trouble because of Kambal Baba; Action demanded by Annis after the magical cure | कंबल बाबा्ंमुळे राम कदम अडचणीत; जादुई उपचारांनंतर अंनिसकडून कारवाईची मागणी

कंबल बाबा्ंमुळे राम कदम अडचणीत; जादुई उपचारांनंतर अंनिसकडून कारवाईची मागणी

googlenewsNext

मुंबई -  सोशल मीडियावर अनेक बाबांचे व्हिडिओ व्हायरल होत असल्याचे आपण पाहिलं आहे. वेगवेगळ्या कृती करुन ते उपचार करत असल्याचं सांगण्यात येतं. काही दिवसांपूर्वी बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींचे प्रकरण चांगलेच वादग्रस्त बनले होते. त्यानंतर, त्यांचा मुंबईत एक कार्यक्रमही पार पडला. आता चक्क भाजपाआमदाराने कंबल बाबांना बोलावून मतदारसंघातील लोकांवर उपचार केल्याची घटनी समोर आली आहे. त्यावरुन, अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आमदार कंबल बाबांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे, आमदार राम कदम अडचणीत आले आहेत. 

राजस्थानामधील कंबल-बाबांना आमदार राम कदम यांनी मतदारसंघात आणले असून येथील विकलांग लोकांवर मोफत उपचार करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे या बाबांकडून उपचारासाठी नागरिकही मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. त्यामुळे, या बाबावर जादूटोणा विरोधी कायद्याखाली कारवाई करण्याची महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मागणी केली आहे. याच कंबल बाबामुळे राम कदमही गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. कारण, राम कदम यांनी कंबल बाबांना मुंबईत पाचारण केल्याचे सांगण्यात येते.

आपल्या मतदारसंघातील विकलांग नागरिकांवर उपचार करण्यासाठी कंबल बाबा यांना बोलावल्याचे राम कदम यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन या बाबांसमवेतचे व्हिडिओही शेअर केले आहेत. त्यामध्ये, काही लोकांवर कंबल बाबांकडून उपचार केले जात असल्याचे दिसून येते. कंबर आणि गुडघ्याचे दुघणे, विकलांग आजार किंवा पॅरेलिसिसचा आजार, अशांवर हे बाबा उपचार करत आहेत, अशा रुग्णांनी येथे येऊन उपचार घ्यावेत, असे आवाहनही राम कदम यांनी केले होते. त्यामुळे, उपचारासाठी मोठी गर्दी होताना दिसत आहे. 

दरम्यान, कंबलबाबा हा भोंदूबाबा असल्याचे सांगत या भोंदूबाबावर पोलिसांनी जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करावा व पीडित व्यक्तींची अशी थट्टा थांबवण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने करण्यात आलीय. मुक्ता दाभोलकर,अण्णा कडलास्कर, मिलिंद देशमुख, राहुल थोरात, प्रशांत पोतदार, नंदिनी जाधव यांनी पोलिसांकडे ही मागणी केली आहे.

Web Title: Ram Kadam in trouble because of Kambal Baba; Action demanded by Annis after the magical cure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.