#KamalaMillsFire: पब्ज, रेस्टॉरंट्सची चौकशी करा, महाराष्ट्रासह अन्य राज्यांना आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 06:10 AM2017-12-30T06:10:20+5:302017-12-30T06:10:31+5:30

नवी दिल्ली : मुंबईतील कमला मिल कंपाऊंडमध्ये गुरुवारी रात्री लागलेल्या आगीनंतर केंद्रीय शहर विकास मंत्रालयाने महाराष्ट्र व दिल्लीसह सगळ्या राज्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांना आपल्या अधिकार क्षेत्रातील अनधिकृत पब व रेस्टाँरंटसची चौकशी करण्यास सांगितले आहे.

#KamalaMillsFire: Investigate the pubs, restaurants, order to other states along with Maharashtra | #KamalaMillsFire: पब्ज, रेस्टॉरंट्सची चौकशी करा, महाराष्ट्रासह अन्य राज्यांना आदेश

#KamalaMillsFire: पब्ज, रेस्टॉरंट्सची चौकशी करा, महाराष्ट्रासह अन्य राज्यांना आदेश

Next

नवी दिल्ली : मुंबईतील कमला मिल कंपाऊंडमध्ये गुरुवारी रात्री लागलेल्या आगीनंतर केंद्रीय शहर विकास मंत्रालयाने महाराष्ट्र व दिल्लीसह सगळ्या राज्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांना आपल्या अधिकार क्षेत्रातील अनधिकृत पब व रेस्टाँरंटसची चौकशी करण्यास सांगितले आहे. नियमांचे पालन न करणारे पब्स, रेस्टाँरंटसवर गरज भासल्यास कायदेशीर कारवाई करण्याचाही सल्ला दिला गेला आहे.
एका अधिकाºयाने सांगितले की अनधिकृत किंवा नियमांचे पालन न करणाºयांवर कारवाईचे अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना आहेत म्हणून हा सल्ला दिला गेला आहे. यापूर्वी घडलेल्या अशा स्वरुपाच्या दुर्घटनांनंतरही योग्य ती कारवाई न केली गेल्यामुळे असा सल्ला द्यावा लागला आहे.
मंत्रालयाकडून बृहन्मुंबईच्या आयुक्तांशी बोलून त्यांना हे सांगण्यात आले आहे की त्यांनी त्यांच्या पातळीवर सगळी रेस्टाँरंट्स व बारमध्ये संकटकाळी बाहेर पडण्याची व्यवस्था असली पाहिजे हे पाहावे. अशा काही इमारती आहेत की तेथे पायºयांचीही सोय नाही व जायला-यायला फक्त लिफ्टची सोय आहे. अशा इमारतींमधून बाहेर पडण्यासाठी जिन्याची सोय आवश्यक आहे हे सांगण्याचाही सल्ला दिला गेला आहे.
आणखी एक अधिकारी म्हणाला की, कमला मिलची दुर्घटना ही एकमेव नाही. त्या आधी गेल्या फेब्रुवारीत दिल्लीत कॅनॉट प्लेसमध्ये वरच्या मजल्यावर अशीच आग लागली होती. एनडीएमने केलेल्या चौकशीत त्या भागात दुसºया व तिसºया मजल्यावर असे अनेक पब्ज व रेस्टाँरंटस आहेत व तेथे सुरक्षेचे उपाय करण्याची गरज असल्याचे दिसले.
दिल्लीतच खान मार्केटमध्ये दुसºया व तिसºया मजल्यावर अनेक रेस्टाँरंट्स व पब्जचा व्यवसाय अनधिकृत सुरू आहे, असे आढळले. तेथे आणीबाणीच्या परिस्थितीत बाहेर पडण्याची सोयच नाही. रूफटॉप किंवा वरच्या मजल्यावरील रेस्टाँरंट्स-बार-पब्जची पाहणी करून गरज भासल्यास नवे धोरण तयार करावे व सुरक्षेच्या नियमांची आवश्यकता सांगावी, असे सांगण्यात आले आहे.

Web Title: #KamalaMillsFire: Investigate the pubs, restaurants, order to other states along with Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.