'विष्णू अवतारा'तील मोदींसाठी जितेंद्र आव्हाडांनी गायली आरती...पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 17:10 IST2018-10-15T16:56:08+5:302018-10-15T17:10:59+5:30

आमदार आव्हाड यांनी सध्या देशात सुरू असलेल्या घोटाळ्याच्या चर्चेतील राफेल करारवरुन मोदींसह अंबानी आणि अदानींना लक्ष्य केलं आहे.

Jitendra Awhad sang the aarti for the 'Vishnu Avatar's Modi ... Watch the video | 'विष्णू अवतारा'तील मोदींसाठी जितेंद्र आव्हाडांनी गायली आरती...पाहा व्हिडीओ

'विष्णू अवतारा'तील मोदींसाठी जितेंद्र आव्हाडांनी गायली आरती...पाहा व्हिडीओ

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते,आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नवरात्रौत्सवात देवीच्या आरतीचे विडंबन करत मोदींना लक्ष्य केलं आहे. मोदींच्या विष्णुच्या अकराव्या अवताराबाबत आव्हाड यांनी चक्क आरती म्हटली. ही आरती म्हणतानाचा एक व्हिडीओ त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे.

आमदार आव्हाड यांनी सध्या देशात सुरू असलेल्या घोटाळ्याच्या चर्चेतील राफेल करारवरुन मोदींसह अंबानी आणि अदानींना लक्ष्य केलं आहे. तसेच भाजपा प्रवक्ते अवधूत वाघ यांनी मोदींना विष्णुचा अकरावा अवतार म्हटले होते. आव्हाड यांनी आपल्या आरतीतून वाघ यांच्या या उपाधीचाही समाचार घेतला आहे. आज फेसबुक पाहत असताना चक्क विमानावर स्वार मोदींचा विष्णुच्या अवतारातील फोटो पाहिला. त्यामुळे नव्या देवाची आरतीच रचण्याचा छोटासा प्रयत्न करत असल्याचे आव्हाड यांनी आपल्या व्हिडीओत म्हटले आहे.  

येइयो अंबानी माझे माउली ये ।।
येइयो अंबानी  माझे माऊली ये !!!
अकरावा आवतार रफेल वर स्वार होसी!! 
अंबानी ला घेऊन  तो फ्रान्स ला जासी ! 
डसाल्ट कंपनीचे तयाला कॉन्ट्रॅक्ट मिळवून देसी।
दोघे मिळोनी भारत देश विकाया नेशी!!!

येइयो अंबानी माझे माउली ये ।।
येइयो अंबानी  माझे माऊली ये !!
!


Web Title: Jitendra Awhad sang the aarti for the 'Vishnu Avatar's Modi ... Watch the video