मुंबापुरीत दुमदुमणार छत्रपतींचा जयघोष!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 01:05 AM2018-02-19T01:05:19+5:302018-02-19T01:05:29+5:30

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा फिव्हर अवघ्या मुंबापुरीवर आहे. रविवारी शिवजयंतीच्या पूर्व संध्येपासूनच विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरू होती.

Chhatrapati shout! | मुंबापुरीत दुमदुमणार छत्रपतींचा जयघोष!

मुंबापुरीत दुमदुमणार छत्रपतींचा जयघोष!

Next

मुंबई : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा फिव्हर अवघ्या मुंबापुरीवर आहे. रविवारी शिवजयंतीच्या पूर्व संध्येपासूनच विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरू होती. शिवजयंतीनिमित्त काळाचौकी, लालबाग, परळ येथील विविध मंडळांना एकत्रित करत, ‘शिवरुद्रा प्रतिष्ठान’ने परळच्या नरे पार्कपासून काळाचौैकीच्या शहीद भगतसिंह मैदानापर्यंत पारंपरिक शोभायात्रेचे आयोजन केले आहे. ‘लोकमत’ या शोभायात्रेचा माध्यम प्रायोजक आहे.
शिवरुद्रा प्रतिष्ठानच्या आयोजन समितीचे सदस्य मितेश येंधे यांनी सांगितले की, शिवजयंतीनिमित्त प्रतिष्ठानने छत्रपती शिवाजी महाराजांचा पालखी सोहळा आयोजित केला आहे. या सोहळ्यात पुरुषांनी सदरा-लेंगा आणि फेटा परिधान करून सामील होण्याचे आवाहन आम्ही केले आहे, तर महिलांना नऊवारी किंवा जमल्यास साडी परिधान करण्याची विनंतीही केली आहे. आयोजन समितीचे सदस्य प्रविण राणे म्हणाले, शोभा यात्रेचे मोठे वैशिष्ट्य म्हणजे या सोहळ््याला काळाचौकी, लालबाग, परळ, चिंचपोकळी आणि एकूणच गिरणगावातील ५५हून अधिक संस्था, संघटना, मंडळांनी पाठिंबा दर्शविला आहे. अन्याय विरोधक सेवा समितीने कार्यक्रमाच्या आयोजनात मोलाची मदत केल्याची माहिती समिती सदस्य गणेश पाशीलकर यांनी दिली.
दरम्यान, शिवजयंतीच्या पूर्व संध्येला आलेल्या रविवारच्या सार्वजनिक सुट्टीचा पूरेपूर लाभ घेत, शिवप्रेमींनी विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्यात भायखळ्यातील श्रीकृष्ण सेवा मंडळाने घोडपदेव येथे वाडिया रुग्णालयाच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते, तर राजमाता जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेने ‘छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवा’निमित्त ‘शंभुराजे गौरव’ पुरस्काराचे वितरण केले.

अशी असेल परळ-लालबाग-काळाचौकीची शोभायात्रा
दुपारी ३ वाजता परळच्या नरे पार्क येथे महाराजांची आरती घेतली जाईल.
ढोल-ताशांच्या सलामीने दुपारी साडेतीन वाजता महाराजांच्या पालखी सोहळ्यास सुरुवात होईल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गे काळाचौकीच्या शहीद भगतसिंह मैदानात पोहोचणाºया या शोभायात्रेत रंगरंगोळी, लेझीम, दांडपट्टा, मल्लखांब, लाठी-काठी अशा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून ऐतिहासिक खेळांचे दर्शन होईल.
राष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटविलेला मल्लखांबपट्टू ऋतुराज शिरोडकर यांची डोळ्यांची पारणे फेडणारी प्रात्यक्षिके नरे पार्क मैदान
व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर असलेल्या मिरवणुकीदरम्यान सादर केली जातील.
सिंहासनावर विराजमान छत्रपती शिवाजी महाराजांची ६ फुटी प्रतिमा या शोभायात्रेतील मुख्य आकर्षण असेल.
सोहळ््याचा समारोप लष्कराचे अधिकारी एस. रामाकृष्णन व त्यांचे लष्करातील सहकारी यांच्या हस्ते होईल.


शिवजयंतीनिमित्त कुठे कोणते कार्यक्रम!
भायखळा पूर्वेकडील श्री कापरेश्वर कृृपा गृहनिर्माण सहकारी संस्थेत ‘शिवरायांची जीवनगाथा’ हा नाट्यप्रयोग होईल. शस्त्रप्रेमींसाठी संस्थेने सोमवारी दिवसभर शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शनही भरविले आहे. गोरेगाव येथील संतोषनगर मार्केट येथे दुपारी ३ वाजता बाइक रॅली आणि नंतर मिरवणूक पार पडेल. मिरवणुकीत ढोल-ताशा पथक, रथयात्रा हे विशेष आकर्षण असेल.

Web Title: Chhatrapati shout!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.