एप्रिल कूल... भुयारी मेट्रो येणार सेवेत! आरे ते बीकेसी पहिला टप्पा होणार सुरू

By सचिन लुंगसे | Published: January 30, 2024 01:33 PM2024-01-30T13:33:32+5:302024-01-30T13:33:53+5:30

Mumbai Metro: देशातली पहिलीवहिली भुयारी मेट्रो असे विशेषण असलेल्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३चा पहिला टप्पा एप्रिल महिन्यात सुरू होणार असल्याची आनंदवार्ता आहे.

April cool... subway metro will be in service! Aarey to BKC first phase will start | एप्रिल कूल... भुयारी मेट्रो येणार सेवेत! आरे ते बीकेसी पहिला टप्पा होणार सुरू

एप्रिल कूल... भुयारी मेट्रो येणार सेवेत! आरे ते बीकेसी पहिला टप्पा होणार सुरू

- सचिन लुंगसे 
मुंबई - देशातली पहिलीवहिली भुयारी मेट्रो असे विशेषण असलेल्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३चा पहिला टप्पा एप्रिल महिन्यात सुरू होणार असल्याची आनंदवार्ता आहे. आरे ते वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) असा हा पहिला टप्पा असून, त्यात दहा स्थानके आहेत. या सेवेमुळे पश्चिम उपनगरांतील मुंबईकरांना वांद्रेपर्यंत येता येणार असून, प्रवास सुसह्य होणार आहे. 

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून (एमएमआरसीएल) भुयारी मेट्रो-३चे काम सुरू आहे. दोन टप्प्यांत हे काम सुरू असून, पहिला टप्पा नव्या वर्षाच्या सुरुवातीला प्रवाशांच्या सेवेत येणार  होता.  मात्र, काही परवानग्या बाकी असल्याने त्यास विलंब झाला. आरे कारशेडच्या सर्व परवानग्या मिळालेल्या आहेत. केवळ १७७ झाडांचा प्रश्न होता. मेट्रो डेपोमध्ये नेण्यासाठीच्या परिसरात ही १७७ झाडे होती. या परिसराला ‘शटिंग नेक’ असे म्हटले जाते. ही झाडे तोडल्याशिवाय या परिसरातील काम करता येत नव्हते. यासंदर्भातील परवानगी विलंबाने मिळाली. त्यामुळे काम करण्यास उशीर झाला. परिणामी मेट्रोच्या पहिल्या टप्प्याला विलंंब झाला. मात्र, आता काम वेगाने सुरू असून, एप्रिल महिन्यात पहिला टप्पा सुरू होणार आहे.

पहिला टप्पा
आरे ते बीकेसी
स्थानके : १० (९ भुयारी तर १ जमिनीवर)

दुसरा टप्पा
बीकेसी ते कफ परेड
स्थानके : १७

Web Title: April cool... subway metro will be in service! Aarey to BKC first phase will start

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.