उन्हाळ्याच्या सुट्टयात कोकणात जाण्यासाठी विशेष ट्रेन धावणार

By सचिन लुंगसे | Published: April 12, 2024 07:45 PM2024-04-12T19:45:19+5:302024-04-12T19:45:36+5:30

याचा फायदा कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना होणार आहे.

A special train will run to Konkan during the summer holidays | उन्हाळ्याच्या सुट्टयात कोकणात जाण्यासाठी विशेष ट्रेन धावणार

उन्हाळ्याच्या सुट्टयात कोकणात जाण्यासाठी विशेष ट्रेन धावणार

मुंबई : उन्हाळ्याच्या सुट्टयामुळे कोकण मार्गावरील रेल्वे गाड्या वाढविण्यात याव्यात, अशी मागणी होत असतानाच आता मध्य रेल्वेने मुंबई ते थिवि दरम्यान ३२ अतिरिक्त उन्हाळी विशेष ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस - थिवि - लोकमान्य टिळक टर्मिनस वातानुकूलित साप्ताहिक विशेषच्या १६ फेऱ्या होतील. लोकमान्य टिळक टर्मिनस - थिवि - लोकमान्य टिळक टर्मिनस सेकंड सीटिंग साप्ताहिक विशेषच्या १६ फेऱ्या होतील. याचा फायदा कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना होणार आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस - थिवि - लोकमान्य टिळक टर्मिनस वातानुकूलित साप्ताहिक विशेषच्या १६ फेऱ्या होतील. ०११८७ वातानुकूलित साप्ताहिक विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १८ एप्रिल ते  ६ जूनपर्यंत दर गुरुवारी २२.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ९.५० वाजता थिवि येथे पोहोचेल. ०११८८ वातानुकूलित साप्ताहिक विशेष थिवि येथून १९ एप्रिल ते ७ जूनपर्यंत दर शुक्रवारी १६.३५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी ३.४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. ठाणे, पनवेल, रोहा, माणगांव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड असे थांबे या ट्रेनला आहेत.

लोकमान्य टिळक टर्मिनस - थिवि - लोकमान्य टिळक टर्मिनस सेकंड सीटिंग साप्ताहिक विशेषच्या १६ फेऱ्या होतील. ०११२९ सेकंड सीटिंग विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून २० एप्रिल ते ८ जूनपर्यंत दर शनिवारी २२.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ९.५० वाजता थिवि येथे पोहोचेल. ०११३० सेकंड सीटिंग विशेष थिवि येथून २१ एप्रिल ते ९ जूनपर्यंत दर रविवारी १६.३५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०३.४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड असे थांबे या ट्रेनला आहेत.

Web Title: A special train will run to Konkan during the summer holidays

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.