lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > जीएसटीमध्ये सरकारने कोणते रंग आणले?

जीएसटीमध्ये सरकारने कोणते रंग आणले?

जीएसटीमधील धूळधाण व करदात्यांची बोंबाबोंब कमी झाली आहे. त्यामुळे जीएसटीमधील होळीचा आनंद वाढणार आहे. नवीन रिटर्न प्रणालीमुळे धूळधाण व बोंबाबोंब नको याची जीएसटी नेटवर्कने काळजी घ्यावी.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 05:38 AM2019-03-18T05:38:43+5:302019-03-18T05:39:08+5:30

जीएसटीमधील धूळधाण व करदात्यांची बोंबाबोंब कमी झाली आहे. त्यामुळे जीएसटीमधील होळीचा आनंद वाढणार आहे. नवीन रिटर्न प्रणालीमुळे धूळधाण व बोंबाबोंब नको याची जीएसटी नेटवर्कने काळजी घ्यावी.

 What colors did the government bring in GST? | जीएसटीमध्ये सरकारने कोणते रंग आणले?

जीएसटीमध्ये सरकारने कोणते रंग आणले?

- सी. ए. उमेश शर्मा

जीएसटीच्या वेगवेगळ्या रंगातून काय बोध घ्यावा?

जीएसटीमधील धूळधाण व करदात्यांची बोंबाबोंब कमी झाली आहे. त्यामुळे जीएसटीमधील होळीचा आनंद वाढणार आहे. नवीन रिटर्न प्रणालीमुळे धूळधाण व बोंबाबोंब नको याची जीएसटी नेटवर्कने काळजी घ्यावी.

अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, भारतात होळीचा सण मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा केला जातो. यानिमित्ताने जीएसटीमध्ये सरकारने कोणते रंग आणले आहे?
कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, दरवर्षीच भारतात होळीचा सण उत्साहाने रंगाचा सण म्हणून साजरा केला जातो. सरकारने जीएसटीमध्ये विविध रंग मिसळून करदात्याला कोठे आनंद तर कोठे करदात्यांची बोंबाबोंब केली आहे.
अजुर्न : कृष्णा, गुलाबी रंग हा सर्वांना आनंद व उत्साह देणारा आहे तर, जीएसटीत गुलाबी रंगरूपी काही तरतुदी आहे का?
कृष्ण : अर्जुना, गुलाबी रंगरूपी सेल्स प्रमोशन्ससंबंधी आयटीसीचे आनंद देणारे स्पष्टीकरण आले आहे त्यात सांगितले आहे की, जर मोफत नमुने व भेट वस्तू हे जीएसटीमध्ये विनामूल्य दिल्यास त्यावर आयटीसी करदात्यांना मिळणार नाही. एक खरेदी करा व दुसरे मोफत मिळवा क्वाँटिटी डिस्काँऊट, सेल्स प्रमोशन, इत्यादी संबंधीतील आयटीसीचा खूलासा देणारे हे परिपत्रक आहे.
अर्जुन : कृष्णा, जीएसटीमध्ये हिरव्या रंगासंबंधी काय तरतुदी आहेत?
कृष्ण : अर्जुना, होळीनिमित्ताने सर्वत्र हिरवळीचे वातावरण असून हिरवा रंग दर्शवितो की, व्हॅटमध्ये झालेल्या चुका, कटकटी विसरून आता जीएसटीकडे वळूयात. म्हणून सरकारने जुने वादविवाद, तंटे मिटविण्यासाठी ‘महाराष्ट्र सेटलमेंट आॅफ एरीअर्स आॅफ टॅक्स इंट्रेस्ट, पेन्लटी आॅर लेट फिस आॅर्डिनन्स अ‍ॅक्ट २०१९’ असा नियम अमलात आणला आहे. याचा अर्थ शासन सर्व जुन्या थकित लवादांना निकाली लावण्याच्या व पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आहे. जसे होळीमध्ये जुन्या प्रणाली जाळून नवीन प्रणाली ना प्रोत्साहन दिले जाते तसेच या कायद्याव्दारे व्हॅटमधील अपील, कटकटी जाळून जीएसटीला करदात्यांनी प्रोत्साहन द्यावे असे शासनाचे प्रयत्न आहे.
अर्जुन : कृष्णा, जीएसटीमध्ये लाल रंगासंबंधी काय तरतुदी आहेत?
कृष्ण : अर्जुना, जीएसटीमध्ये १ एप्रिल २०१९ पासून नवीन रिटर्न प्रणाली येणार आहे. अजून जुन्या रिटर्न प्रणालीमध्येच करदात्यांना अडचणी असून लाल रंग दर्शवितो की, येणाऱ्या नवीन प्रणालीसाठी करदात्यांना सावध रहावे लागेल. नवीन प्रणालीमध्ये सामान्य, शाहज, सूगम असे परतावे असतील.
अर्जुन : कृष्णा, जीएसटीमध्ये काळा रंग कोणता आहे ?
कृष्ण : अर्जुना, काळा रंग हा अंधार, नकार, ताणतनाव इत्यादी दर्शवितो. रिअल इस्टेट विषयक २४ फेब्रुवारीला झालेल्या परिषद बैठकीत निर्णय झाले असून त्याचे अजूनही स्पष्टीकरण आले नाही. बांधकाम व्यावसायिकांना १२ टक्के जीएसटी आणि अ‍ॅफोर्डेबल हाऊसिंग (प्रधानमंत्री गरीब आवास योजना) अंतर्गत घरांवर ८ टक्के जीएसटी भरावा लागत असे व पूर्ण खरेदीवर आयटीसी मिळत असे. १ एप्रिल २०१९ पासून आयटीसी शिवाय ५ टक्के जीएसटी प्रस्तावित केला आहे. त्यामूळे रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये काळ्या रंगाप्रमाणे संभ्रम अवस्था आहे. या सर्व कटकटीमुळे घरांची नवीन बुकींग काही होईना व उरलेल्या आयटीसीचे काय असा सर्व बांधकाम व्यावसायिकांना प्रश्न पडला आहे.
अर्जुन : कृष्णा, जीएसटीचे असे कोणते रंग आहे जे निघतच नाही ?
कृष्ण : अर्जुना, जीएसटीमधील खरेदी विक्रीतील मिसमॅच, ई-वे बील, रिव्हाईज रिटर्नच्या अडचणी आणि अशा काही अडचणी ज्या करदात्याला भोगाव्याच लागणार व त्यातील दुरूस्तीच्या मर्यादा, करदात्यांची पाठलाग करणे सोडत नाही. जसे होळीतील काही रंग दुसऱ्या दिवशीही निघत नाही.
अर्जुन : कृष्णा, लहान करदात्यांसाठी जीएसटीमधील होळीचा सण कसा राहील?
कृष्ण : अर्जुना, १ एप्रिल १९ पासून ज्या करदात्यांची वस्तू विक्रीची उलाढाल ४० लाखांपर्यंत असेल तर त्यांना नोंदणीची गरज नाही, ज्याची मर्यादा आधी २० लाख अशी
होती. कंपोझिशन स्किमची मर्यादा १.५ कोटीपर्यत वाढवण्यात
येणार आहे. सेवा पुरवठा करणाऱ्यांना नवीन कंपोझिशन स्किमची मर्यादा
५० लाखांपर्यंत करण्यात येणार
असून त्यावर ६ टक्के दराने जीएसटी भरावा लागणार आहे. त्यामुळे लहान लहान करदात्यांच्या होळीमधील आंनद द्विगुणीत होईल अशी अपेक्षा आहे.

Web Title:  What colors did the government bring in GST?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.