lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > इतिहास रचणा-या शेअर बाजाराची विक्रमी घौडदौड कायम, बाजार उघडताच सेन्सेक्सची उसळी

इतिहास रचणा-या शेअर बाजाराची विक्रमी घौडदौड कायम, बाजार उघडताच सेन्सेक्सची उसळी

मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने काल इतिहास रचल्यानंतर आजही सेन्सेक्सची विक्रमी घौडदौड सुरु आहे. गुरुवारी सकाळी 395 अंकांच्या वाढीसह सेन्सेक्स 35,477 अंकांवर पोहोचला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2018 10:19 AM2018-01-18T10:19:16+5:302018-01-18T10:23:25+5:30

मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने काल इतिहास रचल्यानंतर आजही सेन्सेक्सची विक्रमी घौडदौड सुरु आहे. गुरुवारी सकाळी 395 अंकांच्या वाढीसह सेन्सेक्स 35,477 अंकांवर पोहोचला.

Sensex rises after market opens | इतिहास रचणा-या शेअर बाजाराची विक्रमी घौडदौड कायम, बाजार उघडताच सेन्सेक्सची उसळी

इतिहास रचणा-या शेअर बाजाराची विक्रमी घौडदौड कायम, बाजार उघडताच सेन्सेक्सची उसळी

Highlights केंद्र सरकारने बाजारातून घेण्यात येणा-या कर्जांना अर्ध्याहून अधिक कात्री लावली आहे.मागच्या दोन महिन्यांपासून शेअर बाजाराचत बुल रन आहे.

मुंबई - मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने काल इतिहास रचल्यानंतर आजही सेन्सेक्सची विक्रमी घौडदौड सुरु आहे. गुरुवारी सकाळी 395 अंकांच्या वाढीसह सेन्सेक्स 35,477 अंकांवर पोहोचला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्येही 85 अंकांची वाढ झाली आणि निफ्टी 10,873 वर पोहोचला. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने बुधवारी ऐतिहासिक कामगिरी केली होती. 

सेन्सेक्सने काल पहिल्यांदाच 35 हजारांचा टप्पा पार केला. केंद्र सरकारने बाजारातून घेण्यात येणा-या कर्जांना अर्ध्याहून अधिक कात्री लावली आहे. त्यामुळे बँकिंग शेअर्सची मागणी वाढून सेन्सेक्सने बुधवारी उच्चांक गाठला. मागच्या दोन महिन्यांपासून शेअर बाजाराचत बुल रन आहे. डिसेंबरच्या अखेरीस आरकॉम संबंधीच्या निर्णयामुळे शेअर बाजार वधारला. 

केंद्र सरकारने 50 हजार कोटी रुपयांचे कर्ज घेण्याचे ठरवले होते. मात्र त्याऐवजी फक्त 20 हजार कोटींचे कर्ज बँकांकडून घेण्याचा निर्णय घेतला. सरकारी कर्ज कमी होण्याचे सकारात्मक संकेत बाजारात पसरले. त्यातून बाजारात खरेदीचा उत्साह निर्माण झाला.  

Web Title: Sensex rises after market opens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.