lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेन्सेक्सची विक्रमी झेप; निफ्टीनं ओलांडला 11 हजारांचा टप्पा

सेन्सेक्सची विक्रमी झेप; निफ्टीनं ओलांडला 11 हजारांचा टप्पा

दोन्ही शेयर बाजारांमध्ये मोठी तेजी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 10:27 AM2018-07-12T10:27:50+5:302018-07-12T10:30:21+5:30

दोन्ही शेयर बाजारांमध्ये मोठी तेजी

sensex hits record high crossed 36500 nifty also crosses 11000 | सेन्सेक्सची विक्रमी झेप; निफ्टीनं ओलांडला 11 हजारांचा टप्पा

सेन्सेक्सची विक्रमी झेप; निफ्टीनं ओलांडला 11 हजारांचा टप्पा

मुंबई: मुंबई शेयर बाजारानं नव्या विक्रमाची नोंद केली आहे. आज सकाळी उलाढालींना सुरुवात होताच मुंबई शेयर बाजारात विक्रमाची नोंद झाली. सेन्सेक्सनं 36 हजार 500 अंकांचा टप्पा ओलांडला आहे. याआधी सेन्सेक्स 36 हजार 443 अंकांवर पोहोचला होता. मात्र आज हा विक्रम मोडीत निघाला. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमध्येही आज अनेक कंपन्यांची कामगिरी चांगली होताना दिसत आहे. त्यामुळे निफ्टी 11 हजारांवर पोहोचला आहे. याआधी निफ्टीनं फेब्रुवारीमध्ये हा उच्चांक नोंदवला होता. 

निफ्टीनं मार्च 2018 पासून 10.4 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. खनिज तेलाचे दर घसरल्यानं तेल क्षेत्रातील कंपन्या आणि टायर कंपन्यांच्या शेयरचे मूल्य वधारले आहे. सकाळी सेनेक्सनं 258 अंकांची उसळी घेतली. तर निफ्टीनं 78 अंकांनी उसळी घेतली. त्यामुळे निफ्टी 11 हजार 27 वर जाऊन पोहोचला. यंदाच्या वर्षात सेन्सेक्सनं 12.5 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. सेन्सेक्सच्या या कामगिरीत एचडीएफसी बँक, टीसीएस, आयआयएल, सनफार्मा, एम अॅण्ड एम, एचयूएल, कोटक महिंद्रा बँक यांचा मोठा वाटा आहे. यंदाच्या वर्षात टीसीएसनं 45%, कोटक महिंद्रा बँकनं 39%, एचयूएल 27%, इन्फोसिसनं 26%, एम अॅण्ड एमनं 24% आणि यस बँकेनं 20 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. 
 

Web Title: sensex hits record high crossed 36500 nifty also crosses 11000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.