lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > एसबीआय थांबविणार इराणला तेलाची देणी

एसबीआय थांबविणार इराणला तेलाची देणी

इंडियन आॅईल कॉर्पोरेशनकडून (आयओसी) इराणमधून आयात होणाऱ्या तेलाचा मोबदला देण्याचे काम नोव्हेंबरपासून थांबविण्याचा निर्णय स्टेट बँक आॅफ इंडियाने घेतला आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 02:07 AM2018-06-16T02:07:45+5:302018-06-16T02:07:45+5:30

इंडियन आॅईल कॉर्पोरेशनकडून (आयओसी) इराणमधून आयात होणाऱ्या तेलाचा मोबदला देण्याचे काम नोव्हेंबरपासून थांबविण्याचा निर्णय स्टेट बँक आॅफ इंडियाने घेतला आहे.

SBI to stop Oil payment for Iran | एसबीआय थांबविणार इराणला तेलाची देणी

एसबीआय थांबविणार इराणला तेलाची देणी

नवी दिल्ली - इंडियन आॅईल कॉर्पोरेशनकडून (आयओसी) इराणमधून आयात होणाऱ्या तेलाचा मोबदला देण्याचे काम नोव्हेंबरपासून थांबविण्याचा निर्णय स्टेट बँक आॅफ इंडियाने घेतला आहे. त्यामुळे भारताला तेलपुरवठा आॅगस्टपासूनच विस्कळीत होण्याचा धोका आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा अणुकरार ८ मे रोजी रद्द केला होता. इराणवर १८0 दिवसांत नव्याने निर्बंध लावण्याची घोषणाही ट्रम्प यांनी केली. अमेरिकेचे निर्बंध लागू होताच एसबीआयकडून पेमेंट हाताळणी बंद करण्यात येणार आहे. आयओसीचे वरिष्ठ अधिकारी ए.के. शर्मा म्हणाले की, नवी व्यवस्था न झाल्यास आॅगस्ट अखेरपासूनच तेलपुरवठ्यावर परिणाम होईल.
इराणला तेलाचा मोबदला युरोमध्ये दिला जातो. त्यासाठी आयओसीकडून एसबीआय व जर्मनीच्या ईआयएचची मदत घेतली जाते. निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर भारतातील सर्वांत मोठी रिफायनरी चालविणाºया रिलायन्स इंडस्ट्रीजकडून इराणी तेलाची आयात थांबविण्याचा विचार सुरू आहे.

Web Title: SBI to stop Oil payment for Iran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.