lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > एटीएममधून काढता येणार फक्त २० हजार रुपये

एटीएममधून काढता येणार फक्त २० हजार रुपये

स्टेट बँकेचे खातेदार आता एटीएममधून एका दिवशी २० हजार रुपयांपर्यंतच रक्कम काढू शकणार आहेत. सद्या ही मर्यादा ४० हजार रुपये आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 05:14 AM2018-10-29T05:14:16+5:302018-10-29T05:14:57+5:30

स्टेट बँकेचे खातेदार आता एटीएममधून एका दिवशी २० हजार रुपयांपर्यंतच रक्कम काढू शकणार आहेत. सद्या ही मर्यादा ४० हजार रुपये आहे.

Only 20 thousand rupees can be withdrawn from the ATM | एटीएममधून काढता येणार फक्त २० हजार रुपये

एटीएममधून काढता येणार फक्त २० हजार रुपये

नवी दिल्ली : स्टेट बँकेचे खातेदार आता एटीएममधून एका दिवशी २० हजार रुपयांपर्यंतच रक्कम काढू शकणार आहेत. सद्या ही मर्यादा ४० हजार रुपये आहे. ३१ आॅक्टोबरपासून नवे नियम लागू होणार आहेत. बँकेने सर्व शाखांना याबाबत निर्देश जारी करण्यात आले आहेत.
मार्च २०१८ पर्यंत बँकेने ३९.५० कोटी डेबिट कार्ड जारी केले आहेत. यातील २६ कोटी कार्ड सध्या वापरात आहेत. अर्थात, बँकेच्या अन्य कार्डवर या नियमांचा परिणाम होणार नाही. उदाहरणार्थ, एसबीआय गोल्ड, प्लॅटिनम डेबिट कार्डची रक्कम काढण्याची मर्यादा क्रमश: ५० हजार आणि १ लाख रुपये आहे.

क्लासिक व माइस्ट्रो कार्डची रोजची रक्कम काढण्याची मर्यादा ३१ आॅक्टोबरपासून ४० हजारांहून घटवून २० हजार करण्यात येणार आहे. जर आपल्याला अधिक रकमेची गरज भासत असेल तर, दुसऱ्या श्रेणीतील कार्डसाठी अर्ज करावा, असे बँकेने स्पष्ट केले आहे. एटीएम व्यवहारात फसवणुकीच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे हा निर्णय घेण्यात येत आहे. तसेच, कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी हे पाउल उचलण्यात आले आल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे.

Web Title: Only 20 thousand rupees can be withdrawn from the ATM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.