lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > अब्जाधीश सिंघानिया पिता-पुत्रांचा फ्लॅटवरुन वाद

अब्जाधीश सिंघानिया पिता-पुत्रांचा फ्लॅटवरुन वाद

विजयपत सिंघानिया यांनी ‘रेमंड लिमिटेड’चे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर असलेल्या गौतम सिंघानिया यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2017 10:36 AM2017-08-08T10:36:58+5:302017-08-08T10:43:17+5:30

विजयपत सिंघानिया यांनी ‘रेमंड लिमिटेड’चे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर असलेल्या गौतम सिंघानिया यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे

Debate over billionaire Singhania father-son flat | अब्जाधीश सिंघानिया पिता-पुत्रांचा फ्लॅटवरुन वाद

अब्जाधीश सिंघानिया पिता-पुत्रांचा फ्लॅटवरुन वाद

Highlightsविजयपत सिंघानिया यांनी गौतम सिंघानिया यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहेमुंबईतील मलबार हिलमधील जे के हाऊस या 36 मजली इमारतीतील ड्युप्लेक्स फ्लॅटचा ताबा दिला जात नसल्याचा आरोप'गौतम सिंघानिया हे रेमंड लिमिटेड कंपनी फक्त स्वतःची मालमत्ता असल्याप्रमाणे वागतात'

मुंबई, दि. 8 - सिंघानिया कुटुंब आणि वादांचं तसं जुनं नातं आहे. सध्या एक नवा वाद समोर आला असून विजयपत सिंघानिया आणि त्यांचा मुलगा गौतम सिंघानिया आमने-सामने आहेत. विजयपत सिंघानिया यांनी ‘रेमंड लिमिटेड’चे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर असलेल्या गौतम सिंघानिया यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेमध्ये मुंबईतील मलबार हिलमधील जे के हाऊस या 36 मजली इमारतीतील ड्युप्लेक्स फ्लॅटचा ताबा दिला जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंबंधी वारंवार गौतम सिंघानिया यांना आठवण करुन देण्यात आलं, मात्र त्याचा फायदा झाला नाही असंही याचिकेत म्हटलं आहे. 

मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार गौतम सिंघानिया आणि त्यांचे वडील विजयपत सिंघानिया यांच्यात मुंबईतील फ्लॅटवरुन वाद सुरु आहे. विजयपत सिंघानिया यांनी गौतम सिंघानियांविरोधात कायदेशीर लढा सुरु केला असून मुंबई उच्च न्यायालयात दरवाजा ठोठावला आहे.

गौतम सिंघानिया हे रेमंड लिमिटेड कंपनी फक्त स्वतःची मालमत्ता असल्याप्रमाणे वागतात, असा आरोपही विजयपत यांनी याचिकेत केला आहे. इमारतीच्या पुनर्विकासासाठी करण्यात आलेल्या करारानुसार, जे. के. हाऊसमधील 5 हजार स्क्वेअर फुटांचा प्लॅट विजयपत सिंघानियांना मिळणं अपेक्षित होतं. मात्र गौतम सिंघानियांमुळे तो त्यांना मिळाला नाही, अशी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल केली आहे. 

विजयपत यांनी गौतम सिंघानिया यांच्यावर चुकीच्या वर्तवणुकीचा आरोपही केला आहे. विजयपथ यांनी न्यायालयाला सांगितलं आहे की, 'रेमंडचे दोन कर्मचारी जितेंद्र अग्रवाल आणि आर के गनेरीवाला यांनी गौतम सिंघानिया यांच्या सांगण्यावरुन महत्वाची कागदपत्रं गायब केली आहेत. त्यामुळे आता आफल्याकडे कोणताच पुरावा नाही आहे'. 

न्यायालयापर्यंत पोहोचलेला हा वाद भविष्यात कुठपर्यंत जातो हे पाहावं लागेल.  दरम्यान या वादावर सिंघानिया पिता-पुत्रांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही. 

 

Web Title: Debate over billionaire Singhania father-son flat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.