lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > व्हिडीओकॉन, कोचर यांच्या कंपनीवर सीबीआयचे छापे

व्हिडीओकॉन, कोचर यांच्या कंपनीवर सीबीआयचे छापे

आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांची न्यूपॉवर रिन्युएबल व वेणुगोपाल धूत यांच्या व्हिडीओकॉन कंपनीविरोधात गुन्हे नोंदवून सीबीआयने गुरुवारी त्यांची कार्यालये आणि मालमत्तांवर छापे टाकले.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 06:30 AM2019-01-25T06:30:56+5:302019-01-25T06:31:15+5:30

आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांची न्यूपॉवर रिन्युएबल व वेणुगोपाल धूत यांच्या व्हिडीओकॉन कंपनीविरोधात गुन्हे नोंदवून सीबीआयने गुरुवारी त्यांची कार्यालये आणि मालमत्तांवर छापे टाकले.

CBI raids on Videocon, Kochar's company | व्हिडीओकॉन, कोचर यांच्या कंपनीवर सीबीआयचे छापे

व्हिडीओकॉन, कोचर यांच्या कंपनीवर सीबीआयचे छापे

मुंबई : आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांची न्यूपॉवर रिन्युएबल व वेणुगोपाल धूत यांच्या व्हिडीओकॉन कंपनीविरोधात गुन्हे नोंदवून सीबीआयने गुरुवारी त्यांची कार्यालये आणि मालमत्तांवर छापे टाकले. आयसीआयसीआय बँक व व्हिडीओकॉनमधील ३२५० कोटींंच्या कर्जाच्या प्रकरणातील १७३० कोटींची फसवणूक उघडकीस येताच, सीबीआयने ही कारवाई केली.
धूत यांच्या व्हिडीओकॉनच्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स व नरिमन पॉइंट येथील आणि दीपक कोचर यांच्या कंपनीच्या पवईतील कार्यालयांवर टाकण्यात आलेल्या छाप्यांनंतर दिवसभर चौकशीचे काम सुरू होते. तेथे नेमके काय आढळले वा तेथून काही कागदपत्रे हस्तगत केली का, हे समजू शकले नाही. हे प्रकरण उघडकीस आल्याला बरेच महिने झाले. त्यानंतर ही कारवाई होण्यास सीबीआयने इतका वेळ का घेतला, याबदनदल आश्चर्य व्यक्त होत आहे. चंदा कोचर सीईओ असताना आयसीआयसीआय बँकेने व्हिडीओकॉन कंपनीला कर्ज दिले होते. कंपनीने दीपक कोचर यांच्या कंपनीला साह्य करावे, यासाठीच बँकेने कर्ज दिल्याचा उल्लेख सीबीआयकडील तक्रारीत आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर चंदा कोचर यांना आॅक्टोबर २0१८ मध्ये राजीनामा द्यावा लागला होता. या घोटाळ्यात चंदा कोचर यांचा नेमका सहभाग किती याची चौकशी त्याआधीच झाली होती.
व्हिडीओकॉन समूहाला २० बँकांच्या समूहाने ४० हजार कोटी रुपयांचे देण्याचे ठरवले होते. त्यात आयसीआयसीआय बँकेचा वाटा ३२५0 कोटी रुपये होता. यामध्ये आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसून आले. आयसीआयसीआयचे कर्ज मिळाल्यानंतर सहा महिन्यांनी धूत यांनी दीपक कोचर यांच्या न्यूपॉवर रिन्युएबलमध्ये सुप्रीम एनर्जीमार्फत
६४ कोटी रुपयांची गुंतवणूक केली. याची ८ डिसेंबर २०१७ मध्ये सीबीआयक्डे तक्रार आली. तपासात १७३० कोटींची फसवणूक झाल्याचे उघड झाले. सीबीआयकडे डिसेंबर २०१७ मध्ये याची तक्रार दाखल झाली होती.
जून २००९ ते आॅक्टोबर २०११ मध्ये आयसीआयसीआय बँकेने व्हिडीओकॉन कंपनीला सहा मोठी कर्जे मंजूर केले. २६ आॅगस्ट २००९ मध्ये व्हिडीओकॉन इलेक्ट्रॉनिक कंपनीला ३०० कोटींचे पहिले कर्ज मंजूर झाले, तेव्हा चंदा कोचर या कर्ज मंजूर करण्याच्या समितीत होत्या. त्यांनी पदाचा गैरवापर करत नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसून आले. नंतर धूत यांनी कोचर यांच्या पतीच्या खात्यात ६४ कोटी वळते केले.
हे अधिकारीही रडारवर
आयसीआयसीआय बँकेने मंजूर केलेल्या कजाच्या काळात बँकेचे सदस्य संदीप बक्षी, के. रामकुमार, संन्जोय चटर्जी, एन. एस. कन्नन,
झरीन दारुवाला, राजीव सभरवाल, के. व्ही. कामत, होमी खुस्रोखान
हे समितीवर होते. कोचर यांची चौकशी सुरू झाल्यावर आयसीआयसीआय प्रुडेशन्शिअल लाइफचे सीईओ संदीप बक्षी यांच्याकडे सूत्रे देण्यात आली.बक्षी यांना बँकेचे तहहयात संचालक व सीओओ करण्यात आले. तेही रडारवर आहेत.
फसवणुकीचा गुन्हा
या प्रकरणात गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचून बँकेच्या फसवणुकीबद्दल भादंवि कलम १२० (ब) आणि ४२० यासह भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ आणि १३ (२) १३ (१)(ड) अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.
सरकारी कर्मचाऱ्याचा समावेश
सीबीआयचे पोलीस निरीक्षक डी. जे. बाजपेयी यांच्या फिर्यादीवरुन ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. वेणुगोपाल धूत यांच्यासह व्हिडीओकॉन इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिक लिमिटेड, व्हिडीओकॉन इंडस्ट्रीज लिमिटेड, चंदा कोचर, दीपक कोचर, सुप्रीम एनर्जी लिमिटेडसह काही व्यक्ती व सरकारी शासकीय कर्मचाºयांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे यातील सरकारी अधिकाºयांचा सहभागाी उघड होण्याची शक्यता सीबीआय अधिकाºयांनी वर्तवली.
>सहा वेगवेगळ्या खात्यांत गैरव्यवहार
आयसीआयसीआय बँकेने व्हिडीओकॉनच्या मिलेनिअम अ‍ॅप्लायन्सेसला १७५ कोटी, स्काय अ‍ॅप्लायन्सेसला २४० कोटी, टेक्नो इलेक्ट्रॉनिक्सला ११० कोटी, अ‍ॅप्लिकॉमला ३०० कोटी, व्हिडीओकॉन इंडस्ट्रीजला ७५० कोटी कर्ज मंजूर केले. सहा खात्यांत १,७३० कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले.

Web Title: CBI raids on Videocon, Kochar's company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.