lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Budget 2019: बळीराजाला मोठ्ठी भेट; छोट्या शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी ६,००० रुपये जमा होणार

Budget 2019: बळीराजाला मोठ्ठी भेट; छोट्या शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी ६,००० रुपये जमा होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने लहान शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. दोन हेक्टर शेत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी केली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2019 11:38 AM2019-02-01T11:38:43+5:302019-02-01T20:05:24+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने लहान शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. दोन हेक्टर शेत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी केली आहे. 

Budget 2019: Biggest announcement for farmers, yearly 6000 rupees will be deposited in Farmer's account by govt | Budget 2019: बळीराजाला मोठ्ठी भेट; छोट्या शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी ६,००० रुपये जमा होणार

Budget 2019: बळीराजाला मोठ्ठी भेट; छोट्या शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी ६,००० रुपये जमा होणार

Highlightsछोट्या शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी ६,००० रुपये जमा होणारप्रधानमंत्री  शेतकरी सन्मान योजना लागू करण्यात येणार आहे.जवळपास 12 कोटी शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना या योजनेचा फायदा होणार आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने लहान शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. दोन हेक्टरपर्यंत  शेत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी केली आहे. 

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळातील शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी आज संसदेत सादर केला. यावेळी मोदी सरकारने शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री  शेतकरी सन्मान योजना लागू करण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून दोन हेक्टरपर्यंत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार असल्याचे अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी जाहीर केले आहे.  


जवळपास 12 कोटी शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना या योजनेचा फायदा होणार आहे. ही योजना लागू करण्यासाठी वर्षाला 75 हजार कोटी रुपये इतका खर्च येणार असून हा सर्व खर्च केंद्र सरकार करण्यार आहे, असेही पीयूष गोयल यांनी सांगितले.   

Budget 2019 Latest News & Live Updates
 


 

Web Title: Budget 2019: Biggest announcement for farmers, yearly 6000 rupees will be deposited in Farmer's account by govt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.